कालबाह्य तारखेनंतर कंडोम वापरल्यास काय होते जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
कंडोम हे सर्वात स्वस्त, सोपे आणि प्रभावी गर्भनिरोधक मानले जाते. अवांछित अर्थात नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी आणि लैंगिक संबंध ठेवताना लैंगिक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कंडोम खूप प्रभावी ठरू शकतात. बहुतेक कंडोम नैसर्गिक रबर म्हणजेच लेटेक्सपासून बनवले जातात आणि त्याची एक एक्सपायरी डेटदेखील असते. ठराविक वेळेनंतर, कंडोमचा लेटेक्स कमकुवत होतो आणि कालांतराने त्याची लवचिकता, ताकद आणि परिणामकारकता कमी होते. तुम्ही कधी विचार केला आहे का की जर चुकून किंवा माहितीच्या अभावामुळे कंडोम एक्सपायरी डेटनंतर वापरला गेला तर काय होऊ शकते? चला जाणून घेऊया याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, एक्सपायरी डेटनंतर कंडोम कमकुवत होतो आणि तो फुटण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ असा की जर तुम्ही संरक्षणासाठी कंडोमवर अवलंबून असाल आणि तो फुटला तर अवांछित गर्भधारणेव्यतिरिक्त, लैंगिक संक्रमित रोग (STDP), HIV, गोनोरिया आणि हेपेटायटीस सारखे संक्रमण पसरू शकतात. एक्सपायरी डेटनंतर, संभोग करताना होणाऱ्या जोरदार हालचालीमुळे कमकुवत कंडोम लवकर फुटू शकतो आणि हे आजार पसरू शकतात. यामुळे संभोग दरम्यान Couples च्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कालबाह्य झालेल्या कंडोमच्या लेटेक्समध्ये आणि त्यात असलेल्या ल्युब्रिकंटमध्ये केमिकल डिग्रेडेशन सुरू होते. याचा अर्थ असा की ते वापरल्याने पुरूष किंवा महिलेला अॅलर्जी, जळजळ, खाज सुटणे किंवा पुरळ यासारख्या त्वचेच्या जळजळीच्या समस्यादेखील उद्भवू शकतात.
जर तुम्हाला शारीरिक संबंध ठेवल्यानंतर कळले की तुम्ही कालबाह्य झालेला कंडोम वापरला आहे, तर घाबरू नका, तर तुमच्या जोडीदाराशी बोला आणि डॉक्टरांशी संपर्क साधा आणि STD चाचणी करा. जर गर्भधारणा होण्याची शक्यता असेल, तर ७२ तासांच्या आत आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला तुम्हाला डॉक्टर देऊ शकतात.
Condom News: भारतातून कोणकोणत्या देशांना होते Condomची विक्री, कोणता देश आहे सर्वात मोठा खरेदीदार?
कालबाह्य झालेले कंडोम वापरल्याने केवळ तुमची सुरक्षितता धोक्यात येत नाही तर तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. म्हणून, वापरण्यापूर्वी नेहमीच एक्सपायरी डेट तपासा आणि ते योग्यरित्या साठवा. याशिवाय, तज्ज्ञ असा सल्लादेखील देतात की कंडोम कधीही पर्समध्ये किंवा खिशात ठेवू नयेत, अन्यथा ते खराब होऊ शकते आणि तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकते. कंडोम खरेदी करण्यापूर्वी, त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासा आणि वेळेवर वापरा.
१. कंडोम कधी लावावा?
लिंग ताठ झाल्यानंतर आणि तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही जननेंद्रियाच्या संपर्कापूर्वी कंडोम घाला तरच त्याचा उपयोग होऊ शकतो
२. कंडोम वापरल्याने गर्भवती होण्याची शक्यता किती आहे?
गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम ८७% प्रभावी आहेत, म्हणजेच कंडोम वापरणाऱ्या १०० पैकी १३ लोक दरवर्षी गर्भवती होतात. परंतु जर तुम्ही कंडोम योग्यरित्या वापरला तर ते आणखी चांगले काम करतात. गर्भनिरोधकाची कोणतीही पद्धत १००% प्रभावी नसते.