Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांतील सिग्मा व्यक्तिमत्व म्हणजे काय? तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता? जाणून घ्या

पुरुषांमध्ये सिग्मा, अल्फा, बीटा तसेच ओमेगा असे काही प्रकार आढळून येतात. पुरुषांच्या व्यक्तिमत्वानुसार त्यांचे वर्गीकरण अशा प्रकारांमध्ये केले जातात. चला तर मग जाणून घेऊयात कि तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये येता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2024 | 04:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इंस्टाग्राम असो किंवा इतर कोणतेही सोशल मिडिया, सगळीकडे सिग्मा बनण्याचा मोह अनेक जणांना लागला आहे. हा मोह जास्त करून पुरुषांमध्ये पाहिला जात आहे. मुळात, हा एक गुणधर्म आहे, जो मूलतः पुरुषांमध्येच आढळून येतो. ग्रीक वर्णमालेनुसार, पुरुषांना त्यांच्या वागण्यावरून असेच वागणुकीच्या गुणधर्मावरून काही प्रकारात विभागले जाते. यामध्ये सिग्मा, अल्फा, बीटा, डेल्टा तसेच गामा आणि ओमेगा हे प्रकार आहेत. परंतु, यातील सिग्मा या प्रकाराला काही जास्तच प्रसिद्धी आहे. पुरुषांतील सिग्मा हा प्रकार इतर प्रकारांपैकी जरा जास्तच आकर्षक मानला जातो. त्याच बरोबर अल्फा या प्रकारालाही पुरुषांमध्ये जास्त प्रसिद्धी आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे कि तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडता तर हा लेख तुम्ही नक्कीच वाचला पाहिजे.

World Toilet Day 2024: का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिवस? जाणून घ्या स्वच्छतेविषयी महत्वाचे नियम

अल्फा म्हणजे काय?

अल्फा हे व्यक्तिमत्व फार आक्रमक असते. यांना राग खूप येत असतो. हे लोकं फार साहसी असतात. शूरता यांच्या नसानसात असते. आत्मविश्वास यांच्या ठासुन भरलेला असतो. यांच्यामध्ये लीडर बनण्याचे गूण असतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना पुढाकार घेण्यास आणि पुढारी बनून मिरवण्यास विशेष रस असतो. यांना जबाबदाऱ्यांची भीती नसते. आपल्या निर्णयावर ठाम असतात. ही लोकं निर्णय घेण्यास सक्षम असतात. त्यांचा स्वतःवरील विश्वास अफाट असतो.

बीटा म्हणजे काय?

बीटा व्यक्तिमत्व फार भावनिक असतात. बीटा व्यक्तिमत्व असलेले लोकं जबाबदारी घेणे टाळतात किंवा त्यांच्यात फार जबाबदाऱ्या घेण्याचे सामर्थ्य नसतात. बीटा व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांना अल्फा पुरुषांशी मैत्री आवडते किंवा ते त्यावर अवलंबून असतात. यांच्यामध्ये आत्मविश्वास फार कमी असतो.

डेल्टा म्हणजे काय?

डेल्टा व्यक्तिमत्व असणाऱ्या पुरुषांमध्ये पुढाकार घेण्याची क्षमता फार कमी असते. परंतु, ते त्यांच्या कामाशी फार प्रामाणिक असतात. अत्यंत साधे पणाने भरलेले असणारे त्यांचे व्यक्तिमत्व शांत आणि सरळ असते. यांच्यावर विश्वास ठेवताना कोणताही विचार नाही केला तरी चालेल.

गामा म्हणजे काय?

गामा व्यक्तिमत्व असणाऱ्या पुरुषांचा स्वभाव फार इन्ट्रोव्हर्ट असतो. ही लोकं फार अंतर्मुखी असतात. यांच्यामध्ये दया भावना ठासून भरलेल्या असतात. यांना अपयशाची फार भीती असते. संघर्ष करण्यासाठी यांची मनस्थिती नसतेच. एकंदरीत, गामा व्यक्तीमत्व असलेली लोकं संघर्ष टाळण्यास प्राधान्य देतात.

‘संडे हो या मंडे’, रोज खा अंडे, महिलांच्या स्मरणशक्तीत होईल सुधारणा, अभ्यासात खुलासा

ओमेगा म्हणजे काय?

एकटेपणाला फार महत्व देतात. स्वतःवर फार नियंत्रण नसते. यांना आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे? एकंदरीत, जीवनाचा उद्देशच ठाऊक नसतो. वैयक्तिक स्वतंत्र्याला जास्त महत्व देतात.

सिग्मा म्हणजे काय?

आजच्या जगामध्ये बहुतेक मुलांना असे वाटत असते कि ते सिग्मा आहेत. मुळात, कधी काळी अल्फा व्यक्तिमत्व असणारे लोकं स्वतःला सिग्मा समजू लागतात. सिग्मा व्यक्तिमत्व असणाऱ्या पुरुषांमध्ये जिद्द फार ठासून भरलेली असते. मानसिकदृष्ट्या फार मजबूत असतात. यांना कधीही दिखावा आवडत नाही. परिस्थितीनुसार, स्वतःला बदलायला आवडते. या लोकांनाही वैयक्तिक स्वातंत्र्यावर काही विशेष प्रेम असते. यांना गोष्टी स्वतःच्या विचारांनीच झालेल्या आवडतात. कधीही कुणावर अवलंबून नसतात.

Web Title: What is a sigma personality in men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 04:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.