पुरूषांमधील Testosterone पातळीची तपासणी करणे आहे आवश्यक
सध्या तुम्हाला अनेक ठिकाणी टेस्टोस्टेरॉन या शब्दाबाबत ऐकू येत असेल वा वाचनात येत असेल. पुरुषांशी संबंधित असणारा हा शब्द महत्त्वाचा आहे. खरं तर पुरूषांनी नियमित टेस्टोस्टेरॉन पातळी टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. टेस्टोस्टेरॉन पातळी चाचणीमध्ये, पुरुषांमधील एक महत्वपूर्ण हार्मोन टेस्टोस्टेरॉन, जो रक्तामध्ये असतो, त्याची पातळी मोजली जाते.
टेस्टोस्टेरॉन पुरुषाच्या आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो, शारीरिक शक्ती आणि स्नायूंच्या वस्तुमानापासून मूड, ऊर्जा आणि लैंगिक कार्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते. या चाचणीमुळे डॉक्टरांना टेस्टोस्टेरॉनची पातळी मर्यादेत आहे की नाही हे समजते तसेच लक्ष देण्याची गरज असलेली एखादी समस्या आहे का हेदेखील समजते. डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजी, न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
टेस्टोस्टेरॉनचे महत्व
टेस्टोस्टेरॉनचे नक्की महत्त्व काय आहे जाणून घ्या
टेस्टोस्टेरॉन हे एक महत्वाचे लैंगिक हार्मोन आहे. पुरुषातील चेहऱ्यावरील केस, खोल आवाज यासारखी शारीरिक लक्षणांचा विकास तसेच स्नायू आणि हाडांची मजबूती राखण्यासाठी हे हार्मोन जबाबदार असते. टेस्टोस्टेरॉन, मूड, ऊर्जा पातळी आणि कामवासना यासारख्या आरोग्याच्या इतर पैलूंवर देखील परिणाम करते
पुरुषाच्या वाढत्या वयानुसार, साधारणपणे वय वर्ष 30 पासून नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते, परंतु पातळी कमी झाल्यास आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात. यामध्ये थकवा, नैराश्य, कामवासना अर्थात लैंगिक इच्छा कमी होणे, लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचणी आणि मसल मास कमी होणे, यांचा समावेश असू शकतो. काही बाबतीत, टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप कमी झाल्यास बोन डेन्सिटिवर परिणाम होऊन फ्रॅक्चर्सची शक्यता वाढते
टेस्टोस्टेरॉन चाचणी कधी करावी?
एखाद्या व्यक्तीमध्ये पुढील प्रकारची लक्षणे आढळल्यास टेस्टोस्टेरॉनपातळी तपासण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो:
मधुमेह, लठ्ठपणा, टेस्टिक्युलरसमस्येचा इतिहास यासारखे आजार असल्यास टेस्टिक्युलर पातळी कमी होण्याची शक्यता असल्यानेअशी लक्षणे असणाऱ्या लोकांना चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.
हेदेखील वाचा – महिलांप्रमाणेच पुरुषांमध्येही रजोनिवृत्ती होते का? काय आहे तथ्य
चाचणी कशी केली जाते?
टेस्टोस्टेरॉनची चाचणी नक्की कशी करावी लागते
टेस्टिक्युलर पातळी रक्ताचा नमूना पाहून करण्यात येते. सकाळच्या वेळी टेस्टिक्युलर पातळी उच्च असल्याने रक्त सहसा सकाळीच घेतले जाते याचाचणी मध्ये रक्तात एकूण किती टेस्टिक्युलर आहे हे पाहिले जाते, ज्यामध्ये बद्ध आणि मुक्त (सक्रिय) दोन्ही प्रकारांचा समावेश आहे.
सामान्यतः टेस्टोस्टेरॉनची पातळी वेगवेगळी असू शकते, ती साधारणपणे, रक्ताच्या प्रति डेसिलिटर (ng/dL) मध्ये 300 आणि 1,000 नॅनोग्रामदरम्यान असते. एखाद्या पुरुषाच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी यापेक्षा कमी असणे म्हणजे टेस्टोस्टेरॉनकमी किंवा “लो टी”.
टेस्टोस्टेरॉन कमी असल्यास उपचार
एखाद्या पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असल्याचे आढळल्यास, उपचार उपलब्ध आहेत. यातला सर्वात सामान्य मानला जाणारा उपाय म्हणजे टेस्टोस्टेरॉन रीप्लेसमेन्ट थेरपी (टीआरटी), जो त्वचेच्या खाली इंजेक्शन्स देऊन, पॅचेस, जेल्स किंवा पेलेट्स ठेवून करण्यात येतो. टीआरटी मुळे टेस्टोस्टेरॉन पातळी पुनर्संचयित होते आणि इतर लक्षणे कमी होतात.
तथापि, टीआरटी प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही आणि त्याचे काही साइड इफेक्ट्स देखील आहेत, त्यामुळे त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत डॉक्टरांशी चर्चा करून समजून घेणे महत्वाचे आहे.
हेदेखील वाचा – टेस्टोस्टेरॉनची पातळी झालीये कमी, त्वरीत ओळखा संकेत अन्यथा होऊ शकणार नाही ‘बाप’
निष्कर्ष
टेस्टोस्टेरॉन पातळीची चाचणी हे पुरुषाच्या आरोग्यासाठी एक सामान्य पण महत्वाचे साधन आहे. टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होण्याचा तुमच्या आरोग्यावर काही परिणाम होतो आहे का हे पाहण्यासाठी तसेच जीवनमान सुधारण्यासाठी त्यावर उपचार करण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्वाची आहे. जर तुम्हाला टेस्टोस्टेरॉनकमी असण्याची लक्षणे असल्यास तुमचे आरोग्य कसे आहे हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम रक्तचाचणी करून घ्यावी.