
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या जीवनशैलीत झोपेच्या तक्रारी झपाट्याने वाआजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या वाढत असून ‘स्लीप हायजिन’ ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे.
स्लीप हायजिन म्हणजे चांगली झोप लागण्यासाठी झोपण्याआधी व दिवसभर पाळायच्या योग्य सवयी.ढत आहेत. अनेक जण रात्री खूप वेळ अंथरुणावर पडून राहतात, पण झोप येत नाही. कधी मन शांत नसते, तर कधी शरीर थकलेले असूनही मेंदू सतत सक्रिय असतो. अशा वेळी ‘स्लीप हायजिन’ ही संकल्पना महत्त्वाची ठरते. स्लीप हायजिन म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पाळायच्या सवयी आणि दिनक्रम. ही केवळ झोपेची वेळ नाही, तर झोपण्याआधी आणि दिवसभरात आपण घेतलेली काळजीही आहे. चांगली झोप ही फक्त आरामासाठी नसून शरीराच्या दुरुस्ती (हीलिंग), हार्मोन्सचे संतुलन, मानसिक स्थैर्य आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यावश्यक असते.
मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीमधून निघणारी ब्लू लाइट मेंदूमधील मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती कमी करते. हेच हार्मोन झोप येण्यासाठी मदत करते. त्यामुळे झोपण्याआधी फोन पाहिल्यास मेंदू अधिक सक्रिय होतो आणि झोप उशिरा येते. म्हणून झोपण्याच्या किमान एक तास आधी स्क्रीन वापर थांबवा. त्या वेळेत हलके वाचन, शांत संगीत किंवा घरच्यांशी गप्पा मारणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार, झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ केल्यास स्नायू सैल होतात आणि शरीराला आराम मिळतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदू शांत होतो. आंघोळ शक्य नसेल, तर कोमट पाण्याने पाय धुणेही उपयुक्त ठरते. शरीराला ‘आता आरामाची वेळ आहे’ असा संकेत मिळतो.
हळदीचे दूध झोपेसाठी एक जुना पण प्रभावी उपाय आहे. ते शरीरातील सूज आणि थकवा कमी करते, स्नायूंना आराम देते आणि मेलाटोनिन वाढवण्यास मदत करते. झोपण्याच्या ३० मिनिटे आधी कोमट हळदीचे दूध घेतल्यास झोप लवकर आणि खोल लागते. रात्री चहा, कॉफी किंवा कॅफीनयुक्त पेये टाळा, कारण ती झोप बिघडवतात. अनेकदा झोप न येण्यामागे विचारांचा गोंधळ कारणीभूत असतो. ऑफिसचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या किंवा भविष्याची चिंता मनात फिरत राहते. अशावेळी झोपण्याआधी ५ मिनिटे डायरी लिहा. दिवसभरातील चिंता कागदावर उतरवल्याने मन हलके होते. यासोबतच 4-7-8 श्वसन पद्धत (४ सेकंद श्वास, ७ सेकंद रोखून धरणे, ८ सेकंद श्वास सोडणे) केल्यास हृदयगती आणि मेंदू शांत होतो. स्लीप एक्सपर्ट्स सांगतात की बेडचा मेंदूशी ‘झोपेचा संबंध’ असणे गरजेचे आहे. बेडवर मोबाइल, वेबसीरिज किंवा ऑफिसचे काम केल्यास मेंदू बेडला आरामाची जागा न समजता कामाची जागा मानतो. त्यामुळे झोप येत नाही. म्हणून बेडवर फक्त झोप किंवा रिलॅक्सेशनसाठीच जा.
एकूणच, स्लीप हायजिन म्हणजे रोजच्या छोट्या सवयींमधून मोठा बदल घडवणे. या सवयी नियमितपणे पाळल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीर-मन दोन्ही ताजेतवाने राहतात.