Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणते खाद्य तेल वापरावे ? जाणून घ्या ‘या’ तेलाचे अनेक फायदे

आपण ज्या हवामान व प्रदेशात राहतो तेथे जे पिकवले जाते ते आपल्या शरीराला पोषक ठरते.

  • By Payal Hargode
Updated On: Apr 09, 2022 | 01:33 PM
कोणते खाद्य तेल वापरावे ? जाणून घ्या ‘या’ तेलाचे अनेक फायदे
Follow Us
Close
Follow Us:

कोणते खाद्य तेल वापरावे ?

आपण ज्या हवामान व प्रदेशात राहतो तेथे जे पिकवले जाते ते आपल्या शरीराला पोषक ठरते.

उदाहरण:

उत्तरप्रदेश येथे – सरसो ऑइल
केरळ येथे – कोकोनट
कर्नाटक येथे- सूर्यफूल
महाराष्ट्र येथे – शेंगदाणा

शेंगदाणा तेल

पदार्थांची रुची वाढवते, चटणी, पिठले ,सॅलेड यांना वरतून वापरले तरी तेलातील जीवनसत्व मिळतात आणि पचन सुधारते. तळण, फोडणीसाठी चालते, गुड कोलेस्ट्रोल वाढवते.
बॅड कोलेस्ट्रोल कमी करते. स्किन सॉफ्ट होते.
जीवनसत्त्वे – A, E, C, D

करडई तेल

स्वयंपाक घरात फोडणीत, पदार्थ तळण्या करीता चांगले आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाब आणि हृदय रोग यावर नियंत्रण येते. चरबी कमी करण्यास उपयुक्त.

सूर्यफूल तेल

स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. थोडा उग्र वास येतो. हाडांसाठी चांगले, संधीवात कमी करते, अस्थमा प्रतिबंध होतो, कर्करोगाला प्रतिबंध होतो.

जवस तेल

स्वयंपाक घरात पदार्थ करण्यासाठी वापरात नाही. हे तेल चटणीमध्ये किंवा कणिक भिजवताना किंवा चपातीला वरती लावून खावे. हे तेल चवीला उग्र असते. उष्ण आणि औषधी आहे. यामुळे हार्टब्लॉकेजेस रक्तातील गुठळ्या कमी होतात. स्त्रियांच्या रजोनिवृत्ती नंतर निर्माण होणाऱ्या इस्ट्रोजन संबंधित हार्मोन्सवर गुणकारी आहे. ओमेगा ३ मुळे पेशींची लवचिकता वाढते. या तेलात ६ जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे, ऑस्टिओपोरासिस, ऑस्टिओआर्थयटीस, अस्थमा, कॅन्सर यामध्ये हे तेल गुणकारी आहे. या तेलाचा वापर योग्य प्रमाणात करावा.

खोबरेल तेल

खोबरेल तेलाचे अनेक उपयोग आहेत.
स्वयंपाकासाठी चांगले आहे.
विशेषतः या तेलात शिरा, पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खूपच चविष्ट होतात. तळण्यासाठी सुध्दा चांगले. याचे वैशिष्ट हे की २ ते ३ वेळेस तळले तरी तेलातील व्हिटॅमिन टिकून राहतात. पोटाचा घेर कमी करून शरीर स्लिम करते. चरबी कमी करणारे आहे. अँटीसेपटिक म्हणून देखील उपयोगी आहे. यामध्ये कापूर, अमृधारा, नीम तेल प्रमाणात टाकल्यास केस काळे व दाट होऊन केसांच्या समस्या दूर होतात. सूर्याच्या कोवळ्या उन्हात वरील मिश्रण लावल्यास कोंडा जातो. शरीरात थंडावा ठेवते.

तीळ तेल

तीळ तेल हे शरीर संतुलित करते. वरतून खाण्यासाठी चांगले. स्वयंपाकासाठी चालते पण तळण्यासाठी वापरू नये. हे तेल मुळात लवकर खराब होत नाही. हाडे मजबूत करते, रक्तदाब नियंत्रित करते, ब्रेनसाठी चांगले, यामध्ये ओमेगा ६, इ, क, ब६ हे जीवनसत्त्वे आहेत.

सरसो तेल

हे तेल अतिशय उष्ण आहे. सर्व प्रकारे स्वयंपाकासाठी वापरता. यामध्ये ओमेगा ३ असते , कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, यांना प्रतिबंध होतो. पचनशक्ती सुधारते, शौचाला साफ होते, प्रतिकार शक्ती वाढवते. या तेलाने मसाज केल्यास अंगदुःखी थांबते.

Web Title: Which edible oil to use what is grown in the climate and region in which we live is nutritious to our body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2022 | 01:33 PM

Topics:  

  • Aarogya Mantra
  • Benefits of Oil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.