
आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाचा इतिहास
जगभरात सगळीकडे 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. समाजातील पुरुषांचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच पुरुषांसमोर येणाऱ्या आव्हानांची जाणीव सगळ्यांना करून दिली जाते. सगळ्यांच्या जीवनात वडील, भाऊ, पती, मित्र किंवा शिक्षक इत्यादी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच आयुष्यच्या प्रत्येक कठीण प्रसंगी खंभीर साथ देऊन संकटाना सामोरे जाण्यास प्रोत्सान देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जगभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस का साजरा केला जातो? यंदाच्या वर्षीची थीम आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसच्या रंजक इतिहासाबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जगभरातील सर्वच देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. या दिवशी पुरुषांचे कौतुक केले जाते. शिवाय या खास दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे अयोज़न केले जाते ज्यात पुरुष सहभागी होतात. कामाच्या धावपळीमध्ये पुरुषांना स्वतःसाठी वेळ देण्यास मिळत नाही. त्यामुळे या दिवशी कामाच्या धावपळीमधून थोडा वेळ काढत पुरुष कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. पुरुषांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, इतरांना मदत करणे इत्यादी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुरुषांना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याची आठवण करून देण्याचा हा खास दिवस. समाजामध्ये पुरुषांना उद्भवणाऱ्या समस्या या दिवशी अधोरेखित केल्या जातात.
वेस्ट इंडिजचे प्राध्यापक डॉ. जेरोम टिळकसिंग यांनी 1999 साली वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका नवीन दिवसाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्या दिवसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस असे नाव देण्यात आले. शिवाय पुरुषांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर भारतामध्ये 2007 पासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी पुरुषांच्या आरोग्याबद्दल जागरूकता पसरवली जाते.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करताना वेगवेगळ्या मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे २०२४ ची थीम मेन्स हेल्थ चॅम्पियन अशी ठेवण्यात आली आहे. पुरुषांचे आरोग्य सुधारणे हा या मागचा विशेष हेतू आहे.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी
सर्वकाही त्याग करणे
आणि नेहमी सर्वांसाठी उभे राहिल्याबद्दल… धन्यवाद!
जागतिक पुरुष दिवसाच्या शुभेच्छा
माणसाला दु:ख जाणवत नाही ही म्हण खरी मानून,
जो वयामुळे आपल्या वेदना लपवतो तोही माणूस असतो,
त्यालाही वेदना होतात… पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंद घेऊन येवो
पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
तुम्ही सदैव आनंदी राहा, निरोगी राहा, निरोगी राहा.
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
तुम्ही नेहमी पुढे जात रहा.
पुरुष दिनाच्या शुभेच्छा