मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी उपाय
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम अनेकदा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा तणाव, मानसिक तणाव, कुटुंबिक जबाबदारी, ताण इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी कमीत कमी तणाव घेत आयुष्य जगणे आवश्यक आहे. बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. हल्ली मोठ्यांपासून ते तरुण वयातील मुलांनासुद्धा टेन्शन येत आहे. सतत मानसिक तणावात राहिल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होण्यास मदत होईल. शिवाय मानसिक आरोग्य चांगले राहील.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
टेंशन कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. ज्यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि मन शांत राहील. श्वास घेताना हळूहळू श्वास घ्यावा आणि फुफ्फुस भरल्यानंतर हळूहळू श्वास सोडावा. ज्यामुळे शरीरात निर्माण झालेला तणाव कमी होईल आणि मन शांत होण्यास मदत होईल. हा उपाय १० ते १५ मिनिटं नियमित केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि इतर समस्यांपासून आराम मिळेल.
अनेकदा काही लोक न आवडणाऱ्या गोष्टीनासुद्धा होकार देतात. पण असे न करता मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला शिका, ज्यामुळे तुमच्या मनावर ओझं निर्माण होणार नाही. सतत मानसिक आणि शारीरिक तणावात राहिल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथे नाही म्हणायला शिका.
पाणी प्यायल्यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होण्यास मदत होते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे पोटातील पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. तसेच तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीचा जास्त राग आल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. पाण्याचे सेवन केल्यामुळे मन आणि शरीर शांत राहते.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी नेहमी हसत राहणे आवश्यक आहे. हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिन्सची निर्मिती होते ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तणाव निर्माण झाल्यानंतर एखादा व्हिडिओ पाहून हसत राहिले पाहिजे. ज्यामुळे मन शांत होईल.






