
सकाळी उपाशी पोटी तूप खाण्याचा सल्ला का दिला जातो? नियमित सेवन केल्यास शरीराला होतील भरभरून फायदे, राहाल कायमच निरोगी
तूप खाण्याचे फायदे?
तूप खाण्याची योग्य पद्धत?
तुपात आढळून येणारे गुणकारी घटक?
दिवसाची सुरुवात उत्साहाने झाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कायमच आनंदी राहावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुपाचे सेवन केल्यास शरीर कायमच हायड्रेट राहील. बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यानंतर तूप खाण्याने किंवा तुपाचे पाणी पिण्याने होते. दैनंदिन आहारात कायमच तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. तुपाचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये चिकटलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते. दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पोटातील घाण बाहेर पडून जाते. पण हीच घाण शरीरात साचून राहिल्यास पोटात जडपणा वाटणे, पोटात वेदना, उलट्या, मळमळ इत्यादी बरीच लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी, कृति सेनन, मलायका अरोरा यांच्यासह अनेक अभिनेत्री सकाळी तूप खातात.आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर नियमित चमचाभर तूप खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर नियमित तूप खाल्ल्यास पोटात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर डिटॉक्स होते. यासाठी चमचाभर तूप खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमधील मल मऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. तूप खाल्ल्यामुळे पोटाच्या आतील थर मुलायम होतो. यामध्ये ब्यूटिरिक ऍसिड भरपूर प्रमाणात आढळून येते. आतड्याना आलेली सूज किंवा पोटाच्या आतील नाजूक अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. वारंवार बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या उद्भवत असतील तर तूप खावे.
चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी कायमच वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण सतत केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. अशावेळी नियमित एक चमचा तूप खाल्ल्यास चेहऱ्यावरील चमक कायमच टिकून राहील. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी तूप खावे. चेहऱ्यावरील चमक वाढण्यासोबतच केस सुद्धा मजबूत आणि मऊ होतील. तुपामध्ये असलेले भरपूर पोषण केसांच्या मुळांना पोषण देतात.
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा काही केल्या वजन कमी होत नाही. अशावेळी सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि चयापचय सुधारते. शरीरात निर्माण झालेली ओमेगा-3 फॅटी ऍसिडची कमतरता भरून काढण्यासाठी तूप खावे.
टॉयलेटमध्ये वापरताय स्मार्ट फोन! Smart बना आणि ‘हे’ करा, वेळीच बदल सवय
सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा तूप खावे. किंवा कोमट पाण्यात चमचाभर तूप मिक्स करून प्यायल्यास महिनाभरात सकारात्मक परिणाम दिसून येतील. तूप खाल्ल्यानंतर कायमच एक ग्लास कोमट पाणी प्यावे. तसेच तूप खाल्ल्यानंतर पुढील ४० ते ५० मिनिटं कोणत्याही पदार्थाचे किंवा पेयांचे अजिबात सेवन करू नये.