Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नानंतर फिरायला जाण्याला ‘हनीमून’च का म्हणतात? कुठून आला हा शब्द आणि कसा आला ट्रेंडमध्ये, इतिहास जो करेल तुम्हाला थक्क!

Honeymoon Origin : नवविवाहित जोडप्यांसाठी 'हनिमून' ही केवळ सहल नसून एक विशेष अनुभव असतो. लग्नाच्या गडबडीनंतर जोडपं एकमेकांसोबत वेळ घालवतं, नवे आयुष्य सुरू करतं.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 27, 2025 | 12:35 PM
Why is post-marriage travel called a honeymoon Surprising history behind the trend

Why is post-marriage travel called a honeymoon Surprising history behind the trend

Follow Us
Close
Follow Us:

Honeymoon Origin : नवविवाहित जोडप्यांसाठी ‘हनिमून’ ही केवळ सहल नसून एक विशेष अनुभव असतो. लग्नाच्या गडबडीनंतर जोडपं एकमेकांसोबत वेळ घालवतं, नवे आयुष्य सुरू करतं. आज हनिमून ही एक सामान्य आणि उत्सुकतेची गोष्ट झाली असली, तरी ही परंपरा खरंतर भारतात नव्हे, तर १९व्या शतकातील ब्रिटनमध्ये सुरू झाली, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हनीफंड या ऑनलाईन विवाह नोंदणी प्लॅटफॉर्मच्या सीईओ सारा मॅरागुलिस यांच्या मते, १८०० च्या उत्तरार्धापर्यंत हनिमूनची कोणतीही स्पष्ट परंपरा नव्हती. ही संकल्पना त्या काळात ब्रिटनमध्येच उदयास आली. मात्र, काही संशोधकांचा असा विश्वास आहे की युरोपियन समाजाने ही संकल्पना भारतातील परंपरेवरूनच घेतली.

‘हनिमून’ शब्दाचा मूळ संदर्भ

‘हनिमून’ हा शब्द सर्वप्रथम १६व्या शतकात रिचर्ड हुलोट यांनी वापरला. त्यावेळी या शब्दाचा अर्थ नवविवाहित दाम्पत्याच्या प्रेमाचा आरंभिक गोड काळ असा घेतला जात असे. यात “हनी” म्हणजे गोडवा आणि “मून” म्हणजे एक कालखंड किंवा बदलता काळ. हुलोट यांनी १५५२ मध्ये नमूद केलं होतं की, लग्नानंतर सुरुवातीला आनंदी असलेली जोडपी नंतर दुःखीही होतात. हे वाक्य त्या काळातील नातेसंबंधांविषयी सांगून जातं.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत

भारतातून प्रेरणा, पण युरोपने जोडली प्रवासाची कल्पना

अनेक लोकांचा विश्वास आहे की बॅबिलोनियन संस्कृतीत हनिमूनसदृश संकल्पना होती, जिथे नवविवाहितांना लग्नानंतर मधापासून बनवलेलं खास शरबत दिलं जायचं. तसेच, ब्रिटिशांनी भारतात राहिल्याच्या काळात पाहिलं की लग्नानंतर नवविवाहित जोडपी नातेवाईकांच्या भेटीला जातात. यामागचा हेतू नातेवाइकांशी ओळख, स्वीकार आणि सामाजिक नातेसंबंधांची जडणघडण असा होता. यात प्रवासाचा भाग नव्हता, पण युरोपियन समाजाने त्यात सहलीचा भाग जोडला, आणि हनिमूनला एक नवीन परिमाण दिलं. कालांतराने हनिमून म्हणजेच विवाहानंतरचा प्रवास, विश्रांती आणि नात्यांचा आरंभ असा अर्थ रूढ झाला.

हनिमून परंपरेचा इतिहास : भारतात नव्हे तर ब्रिटनमध्ये झाला जन्म! आता ‘मिनी मून’चा ट्रेंडही वाढतोय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

हनीमूनचा नॉर्डिक संदर्भही विचित्र

काही संशोधकांचा दावा आहे की ‘हनिमून’ हा शब्द नॉर्डिक भाषेतील ‘हजुनोत्स्मानथ्र’ या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ असा की वर आपल्या वधूचं अपहरण करतो आणि तिचं कुटुंब शोध थांबवेल, तोपर्यंत तिला लपवून ठेवतो! अर्थात, ही संकल्पना आता केवळ ऐतिहासिक दृष्टीने उल्लेखनीय आहे.

आधुनिक काळात ‘मिनी मून’चा ट्रेंड

आजकाल ‘हनिमून’सह ‘मिनी मून’ चा ट्रेंडही प्रचलित होत आहे. यामध्ये जोडपी लग्नानंतर लगेच लांब सहलीऐवजी छोट्या, झपाट्याने पार पडणाऱ्या सहलीला जातात. त्यानंतर भविष्यात मोठी सहल आयोजित केली जाते. हनीफंडच्या सारा मॅरागुलिस सांगतात की, कामाच्या व्यस्ततेमुळे जोडपी लवकर परतणाऱ्या, कमी खर्चिक सहलीला प्राधान्य देत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ढाकामध्ये दुर्गा मंदिराची तोडफोड; भारताने बांगलादेश सरकारला फटकारले, हिंदू सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 परंपरा बदलली, पण भावना कायम

भलेही हनिमूनची परंपरा भारताची नसून ब्रिटनमधून आलेली असली, तरी भारतीय समाजाने तिला उबदारपणे स्वीकारलं आहे. बदलत्या काळात या परंपरेचे स्वरूप, कालावधी आणि जागा बदलत आहेत. पण त्यामागची भावना एकमेकांना समजून घेणं, एकत्र आयुष्याची सुरुवात करणं आजही तितकीच शाश्वत आणि महत्त्वाची आहे.

Web Title: Why is post marriage travel called a honeymoon surprising history behind the trend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • day history
  • honeymoon destintions
  • special story

संबंधित बातम्या

World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण
1

World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 निमित्त HCL फाउंडेशनने देशव्यापी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे केले नेतृत्व
2

आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 निमित्त HCL फाउंडेशनने देशव्यापी सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे केले नेतृत्व

RPF Foundation Day 2025 : भारतीय रेल्वेचा अदृश्य आधारस्तंभ; जाणून घ्या ‘आरपीएफ स्थापना दिन’ का आहे खास?
3

RPF Foundation Day 2025 : भारतीय रेल्वेचा अदृश्य आधारस्तंभ; जाणून घ्या ‘आरपीएफ स्थापना दिन’ का आहे खास?

International Equal Pay Day: आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व
4

International Equal Pay Day: आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.