हार्ट अटॅक येण्याची लक्षणे
धावपळीच्या जीवनात सतत काम, खाण्यापिण्याच्या सवयी, सतत बाहेरचे पदार्थ, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पण हल्लीच्या तरुणाईमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीच्या काळी 60 किंवा 70 वयोगटातील व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येत होता. मात्र कोरोनाच्या दिवसांनंतर सर्वच गोष्टींमध्ये बदल झाल्यानंतर तरुण वयात सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने आत्तापर्यंत अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे.
काही दिवसांमध्ये पुण्यात तरुण आणि लहान मुलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. तरुण वयातच हृदयविकाराचा झटका येऊ लागल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. 38 वर्षीय डॉक्टर ड्रायव्हिंग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उंद्री येथील 15 वर्षीय शाळकरी मुलीला वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घेऊन गेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी तिला पुन्हा जिवंत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: जेवल्यानंतर ‘या’ गोष्टी पाण्यासोबत प्या, जाणून घ्या
हार्ट अटॅक येण्याची लक्षणे
सतत बदलत चालेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. कमी वयात हृदय कमकुवत होऊन हृदयविकाराचा झटका येतो. तरुणांमध्ये सतत धूम्रपान करणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे,झोपेचा अभाव, अमली पदार्थांचे सेवन करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत राहिल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: मेंदूमधील रक्तवाहिन्या का फुटतात? जाणून घ्या ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी काय करावे