Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

गेल्या महिन्यात एक्सप्रेसवेवर सुमारे ३२ तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे हजारो प्रवासी तासन् तास अडकून पडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 06:19 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
Follow Us
Follow Us:

काही दिवस आधी मुंबई-पुणे महामार्गावर 32 तास वाहतूक कोंडी 
प्रवाशांचे झाले होते मोठ्या प्रमाणात हाल 
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव

पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर काही दिवस आधी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास 32 तासांपेक्षा जास्त कालावधी वाहतूक कोंडी झालेली. गॅस टॅंकर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यानंतर सरकारवर, तेथील प्रशासनावर देखील टीका झाली. यानंतर आता नवीन मार्गाचा प्रस्ताव समोर येत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नव्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मार्गावरील वाढत्या गर्दीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.त्यानंतर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या उरण-कर्जत-शिरूर महामार्गाच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘या’ शहरांमध्ये नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया, मुंबईचा क्रमांक पाहून धक्का बसेल

गेल्या महिन्यात एक्सप्रेसवेवर सुमारे ३२ तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे हजारो प्रवासी तासन् तास अडकून पडले.सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंडला येथे कोंडी होणे आता नेहमीचे झाले आहे.त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान एकाच मार्गावर अवलंबून राहणे धोक्याचे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर सुमारे १३५ किलोमीटर लांबीचा शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण असा चारपदरी मल्टिनोडल कॉरिडॉर प्रस्तावित आहे. हा मार्ग सुरू झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. औद्योगिक भागांतील मालवाहतूक थेट उरण बंदराशी जोडली गेल्यास मोठी सोय होईल.मात्र हा प्रकल्प अद्याप मंजुरी आणि अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर या पर्यायी मार्गाबाबत प्रशासन लवकर निर्णय घेणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांचे वर्षातील 100 तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातात वाया

 

भारतातील सर्वाधिक ट्रॅफिक असणारी शहरं

बंगळुरू

टॉमटॉम इंडेक्सनुसार, बेंगळुरू या यादीत अव्वल स्थान पटकावला आहे. या शहरातील सरासरी वाहनांचा वेग फक्त 16.6 किमी/तास नोंदवला गेला. येथील रहिवासी 15 मिनिटांत सरासरी 4.2 किमी प्रवास करतात. शिवाय, लोक वर्षाला 168 तास वाहतूक कोंडीत वाया घालवतात.

बाइकप्रेमींनोsss ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 350cc बाईक्स, दमदार परफॉर्मन्ससोबतच मिळणार उत्तम मायलेज

पुणे

दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे, जिथे सरासरी 18 किमी/ताशी वेग आहे आणि सरासरी 4.5 किमी अंतर 15 मिनिटांत पार केले जाते. येथील लोक वाहतुकीमुळे वर्षाला 152 तास वाया घालवतात.

मुंबई

स्वप्नगरी मुंबई शहरात वाहनांचा सरासरी वेग 20.8 किमी/तास आहे आणि 15 मिनिटांत कापलेले सरासरी अंतर 5.2 किमी आहे. मुंबईतील लोक दरवर्षी त्यांच्या वर्षातील 126 तास वाहतूकीत वाया घालवतात.

 

Web Title: Uran karjat shirur optional rod to break traffic jam in pune mumbai express way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Mumbai News
  • National Highways
  • pune news
  • traffic jam

संबंधित बातम्या

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट
1

Shaktipeeth Highway News: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग मोकळा! ६२०० हेक्टर जमिनीच्या संपादनाबाबत प्रशासनाची मोठी अपडेट

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
2

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
3

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
4

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.