फोटो सौजन्य - Social Media
स्वप्न म्हणजे आपल्या आयुष्याचा आरसा! हे खरं आहे की, स्वप्न विचारांच्या पलीकडे असतात पण स्वप्न स्वतः एक विचार असतात. आपल्या स्वप्नात ज्या गोष्टी घडतात किंवा दिसतात, त्या आपल्या आयुष्याशी निगडित असतात. एकंदरीत, आपल्या स्वप्नांच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील काही तरी भागाचा अंदाज बांधू शकतो. आपण भुतांची फिल्म बघत नाही तसेच त्या संबंधित कोणते पुस्तके वाचत नाही तरीही जर आपल्या स्वप्नात भूत-प्रेत तसेच राक्षसांचा सावट असेल तर हीच वेळ आहे. पुढचं पाऊल उचला. या संबंधित काही तरी कृती करा.
स्वप्नशास्त्राच्या अनुसार, अनेक कारण आहेत ज्यामुळे आपल्याला अशी वाईट स्वप्न येत असतात. पण ही सगळी कारणे वाईटच आहेत. यामध्ये नाकारात्मकतेचा वास येत असतो. जेव्हा स्वप्नात अशा भूत प्रेतांशी सामना होतो तेव्हा समजून जा की भविष्यात एका मोठ्या हानीचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला भविष्यात फार कष्ट घ्यावे लागणार आहेत किंवा भविष्यात तुमचा घात होणार आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीवर वाईट शक्तीने अधिकार गाजवून वष करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला असे स्वप्न येतात.
कधी कधी आपण जास्त ताण दिला तर असे स्वप्न येणे स्वाभाविक आहे. पण अशा स्वप्नांना मुळापासून संपवण्यासाठी स्वप्न विश्लेषक किंवा कोणत्या तद्न्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एखाद्या ज्योतिषीकडे जाऊन त्याचा सल्ला घेणे आणि त्यावर तोडगा काढणे कधीही उत्तम ठरते.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)