
हिवाळ्याच्या थंडीत घरी बनवा चविष्ट 'रताळ्याचे पराठे', अभिनेत्री जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी
बॉलीवूड सेलिब्रिटी आपल्या फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्यात अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या साध्या, घरगुती आणि पोषणमूल्यांनी भरलेल्या जेवणासाठी खास प्रसिद्ध आहे. अनेकदा तिच्या मुलाखतींमध्ये ती सांगते की तिला अत्यंत साधं, देसी आणि पौष्टिक अन्न आवडतं. विशेष म्हणजे, ती ‘स्वीट पोटॅटो’ म्हणजेच रताळ्याची मोठी फॅन आहे. रताळे हे नैसर्गिक गोड असते, फायबरने समृद्ध असते आणि पचायला अगदी हलके असते. त्यामुळे व्यायामानंतर किंवा व्यस्त दिवसात रताळ्याचे पदार्थ पौष्टिक, चविष्ट आणि हेल्दी एनर्जी देणारे ठरतात.
Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!
रताळ्याचे पराठे हा असा एक पदार्थ आहे जो हेल्दी, पोटभरीचा आणि अतिशय चवदार असतो. जान्हवी कपूरच्या आवडीचा हा पराठा तिच्या आहाराचा भाग मानला जातो कारण तो कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन A, पोटॅशियम आणि फायबरने परिपूर्ण आहे. शिवाय रताळे शरीराला त्वरित ऊर्जा देतात, त्वचेसाठी फायदेशीर असतात आणि गोड चवेमुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्या रात्रीच्या जेवणासाठी हे पराठे अगदी योग्य. ते बनवायला सोपे, साधे आणि कोणत्याही विशेष साहित्याशिवाय तयार होतात. चला तर मग, जाणून घेऊया जान्हवी कपूरच्या फेव्हरेट स्टाइलमध्ये बनवलेले हेल्दी आणि सॉफ्ट रताळ्याच्या पराठ्याची रेसिपी!
साहित्य
कृती