Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश
Radish Paratha Recipe : मुळ्याचा पराठा हा पारंपरिक भारतीय पदार्थ आहे जो घरगुती चवीने आणि आरोग्याने भरलेला आहे. सकाळी नाश्त्यासाठी किंवा प्रवासात सोबत न्यायला हा उत्तम पर्याय आहे.
हा पराठा चवीला उत्तम लागतो, शिवाय आरोग्यासाठीही फायद्याचा ठरतो
सकाळच्या नाश्त्यात तुम्ही या रेसिपीचा समावेश करू शकता
हिवाळ्याच्या थंडगार सकाळी गरमागरम पराठ्यांचा आस्वाद घेतला नाही, तर नाश्ता अपूर्णच वाटतो. अशा वेळी “मुळ्याचा पराठा” हा उत्तम पर्याय आहे. मुळा हा पोषक तत्वांनी समृद्ध असा मूळभाजी प्रकार आहे ज्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन C आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. त्यामुळे हा पराठा केवळ स्वादिष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. मुळ्याचा पराठा हा उत्तर भारतात विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये लोकप्रिय आहे. दही, लोणी किंवा चटणीसोबत खाल्ला तर याचा स्वाद दुप्पट वाढतो. सकाळचा नाश्ताअसो किंवा लंचबॉक्ससाठी काहीतरी झटपट पण पौष्टिक बनवायचं असेल, तर मुळ्याचा पराठा एकदम योग्य पर्याय आहे. चला तर पाहूया हा स्वादिष्ट आणि हेल्दी मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम गव्हाच्या पीठात मीठ व तेल घालून मऊसर कणिक भिजवा. 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवा.
मुळा किसून त्यात थोडे मीठ टाका आणि 10 मिनिटे ठेवून द्या. नंतर हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका. त्यामुळे पराठा ओला होणार नाही.
एका भांड्यात मुळा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळा. हेच तुमचं सारण तयार आहे.
भिजवलेल्या कणकेचे समान आकाराचे गोळे करा. एक गोळा लाटून त्याच्या मध्यभागी थोडं सारण ठेवा. कडेनी कडेनी दुमडून गोळा तयार करा.
तो गोळा हलक्या हाताने पराठ्यासारखा लाटून घ्या. लक्षात ठेवा फार जोरात लाटू नका, नाहीतर सारण बाहेर येईल.
तवा गरम करून त्यावर थोडं तेल किंवा तूप घाला आणि पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजा.
गरमागरम पराठा लोणी, दही किंवा हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.
मुळ्याचं पाणी टाकून द्यायचं नाही; त्यातून तुम्ही कणिक भिजवू शकता. त्यामुळे चव आणि पौष्टिकता वाढेल.
मुळ्याऐवजी तुम्ही त्यात थोडं किसलेलं गाजर किंवा कांदा देखील घालू शकता.
डब्यासाठी बनवत असाल तर पराठ्यावर थोडंसं बटर लावा, त्यामुळे ते मऊ राहतील.
Web Title: Winter special make tasty and nutritious mooli paratha at home recipe in marathi