Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोग दिनानिमित्त साहस, धैर्य, आशेचे साजरीकरण! फोर्टिसकडून कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स आणि रूग्‍णांसाठी टॅलेंट अँड पेंटिंग आयोजन

फोर्टिसकडून कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स आणि रूग्‍णांसाठी टॅलेंट अँड पेंटिंग सत्राचे आयोजन टॅलेंट अँड पेंटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 05, 2025 | 10:15 AM
फोर्टिसकडून कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स आणि रूग्‍णांसाठी टॅलेंट अँड पेंटिंग सत्राचे आयोजन

फोर्टिसकडून कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स आणि रूग्‍णांसाठी टॅलेंट अँड पेंटिंग सत्राचे आयोजन

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जागतिक कर्करोग दिन 2025 साजरा करण्‍यासाठी फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने टॅलेंट अँड पेंटिंग सत्राचे आयोजन केले, ज्‍यामध्‍ये कर्करोगाने पीडित रूग्‍ण व सर्व्‍हायवर्सच्‍या अविश्‍वसनीय प्रतिभा पाहायला मिळाल्या. या उपक्रमामध्‍ये 150 व्‍यक्‍तींचा सहभाग दिसण्‍यात आला आणि त्‍यांनी एकत्र येत अनुभवांची देवाणघेवाण केली, तसेच कर्करोगाने पीडितांप्रती एकजूटता व्‍यक्‍त केली. यामुळे जागतिक थीम ‘युनायटेड बाय युनिक’शी बांधील राहत कर्करोग केअरबाबत अर्थपूर्ण संवादांना चालना देण्‍याच्‍या माध्‍यमातून आशा व सामुदायिक भावनेला चालना मिळाली. तसेच कर्करोगावरील उपचार प्रवासादरम्‍यान मानसिक व भावनिक आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याचे महत्त्व देखील निदर्शनास आले.

सोनू निगमला होतोय पाठदुखीचा त्रास! स्नायूंमध्ये क्रॅम्प आल्यास नक्की करा ‘हे’ घरगुती उपाय

या उपक्रमाने सहभागींना सर्जनशीलपणे संलग्‍न होण्‍यासाठी महत्त्‍वपूर्ण प्‍लॅटफॉर्म दिला, तसेच कर्करोगाशी संबंधित प्रमुख समस्‍यांबाबत जागरूकतेचा प्रसार केला. आपल्‍या परफॉर्मन्‍सच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तींनी वैयक्तिक गाथा शेअर केल्‍या, कर्करोगग्रस्‍त सह-रूग्‍णांना पाठिंबा दिला आणि कर्करोगावर मात करण्‍यासाठी लवकर निदान, प्रतिबंध व उपचाराच्‍या महत्त्वावर भर दिला. पाठिंबा व एकजूटता दाखवण्‍यासाठी फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स देखील इव्‍हेण्‍टप्रसंगी उपस्थित होते आणि त्‍यांनी कर्करोगाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यामध्‍ये सहाय्यक समूह बजावणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत भाषण सादर केले.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील फॅसिलिटी डायरेक्‍टर डॉ. विशाल बेरी म्‍हणाले, ”आम्‍हाला हा इव्‍हेण्‍ट आयोजित करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटतो, जो कलाकृती व सर्जनशीलतेचे साजरीकरण असण्‍यासोबत त्‍यामधून कर्करोगाचा सामना केलेल्‍या आणि पॅशन व चिकाटीसह विषमतांवर मात केलेल्‍या कर्करोगाने पीडित व्‍यक्‍तींचे साहस, धैर्य आणि चिकाटी दिसून येते. प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यसेवेचे अग्रणी म्‍हणून आम्‍ही जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा, सामुदायिक भावनेला चालना देण्‍याचा आणि या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून लवकर निदान व उपचाराच्‍या महत्त्वावर भर देण्याचा प्रयत्‍न केला आहे. सहयोगाने, आम्‍ही आजाराचा सामना करण्‍यासोबत समुदायामध्‍ये पाठबळ, करुणा व प्रगतीची भावना जागृत करत आहोत.”

शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ आंबट गोड फळाचे सेवन,आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

श्री. मंधारे (कॅन्‍सर वॉरियर) म्‍हणाले, ”आज येथे उपस्थित राहून अनेक अविश्‍वसनीय व्‍यक्‍तींसोबत परफॉर्म करताना मला आम्‍ही सर्वांनी इथवर आलेल्‍या प्रवासाची आठवण झाली. कर्करोगाने आमच्‍यावर मोठा परिणाम करण्‍याचा प्रयत्‍न केला, पण आम्‍ही ते यशस्‍वी होऊ दिले नाही. आम्‍ही आज आमच्‍या गाथा, आमचा आनंद, हास्‍य व आशा शेअर करण्‍यासाठी समुदाय म्‍हणून एकत्र आलो. कर्करोगामुळे वेगळेपणाची भावना निर्माण होऊ शकते, पण यासारखे इव्‍हेण्‍ट्स मला आठवण करून देतात की आम्‍ही या लढ्यामध्‍ये कधीच एकटे नाही आहोत. आमच्‍यामध्‍ये दृढ नाते निर्माण झाले आहे, जे आमच्‍या कर्करोगावर मात करण्‍याच्‍या प्रवासापलीकडे देखील राहिल.”

Web Title: World cancer day talent and painting organized by fortis for cancer survivors and patients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • Doctor advice
  • world cancer day

संबंधित बातम्या

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
1

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

घरातील झुरळांना चुकीच्या पद्धतीने मारताय? आरोग्यासंबंधित वाढेल ‘या’ आजारांचा धोका, शरीराचे होईल नुकसान
2

घरातील झुरळांना चुकीच्या पद्धतीने मारताय? आरोग्यासंबंधित वाढेल ‘या’ आजारांचा धोका, शरीराचे होईल नुकसान

प्रौढांना न्यूमोकॉक्कल आजारांपासून व्यापक संरक्षण पुरविण्यासाठी फायझरने आणली २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लस
3

प्रौढांना न्यूमोकॉक्कल आजारांपासून व्यापक संरक्षण पुरविण्यासाठी फायझरने आणली २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लस

सामान्य वाटणारी ‘ही’ गोष्ट आहे स्कीन कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात
4

सामान्य वाटणारी ‘ही’ गोष्ट आहे स्कीन कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.