शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा 'या' आंबट गोड फळाचे सेवन
चवीला आंबट गोड असलेली हिरवी आणि काळी द्राक्ष लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष असतात. त्यामुळे तुम्ही द्राक्षाचा ज्यूस किंवा मनुका खाऊ शकता. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली द्राक्ष आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. द्राक्षाचे सेवन केल्यामुळे शरीरातील वाढलेली उष्णता नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. तर हृदयाचे आरोग्य सुधारून बिघडलेली पचनक्रिया सुधारू लागते. काळी आणि हिरवी द्राक्ष चवीला आंबट गोड असतात. द्राक्ष खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – iStock)
मज्जासंस्था आणि शरीराच्या नसा मजबूत ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन
नियमित द्राक्षांचे सेवन केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते, डोळ्यांची कमजोरी कमी, हाडांचे दुखणे कमी होऊन आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. द्राक्षचे सेवन केल्यामुळे शरीरातील साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे पोट आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला नियमित द्राक्षांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत बसने, सतत मोबाईल पाहणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर पडतो. द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ल्यूटेन नावाचा घटक आढळून येतो ज्यामुळे डोळ्यांच्या पेशी सुधारतात. डोळ्यांवर ताण आल्यानंतर दृष्टी कमकुवत होऊन जाते. याशिवाय डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे, सतत डोळे चिकटल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्येंपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्षाचे सेवन करावे.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ आंबट गोड फळाचे सेवन
शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ झाली नाहीतर पोटात ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्षाचे सेवन करावे. यामुळे पोटातली आतड्या स्वच्छ होतात. नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून शरीरात द्राक्ष कार्य करतात. शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर प[पडून गेल्यानंतर त्वचा सुधारते, शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
वाढत्या वयानुसार हाडं दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी दैनंदिन आहारात द्राक्षाचे सेवन करावे. कारण यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विटामिन के इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्षाचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
कॉफी पिण्याने कोलेस्ट्रॉल वाढतं? Heart Attack पासून दूर राहण्यासाठी अभ्यासातील खुलासा एकदा वाचाच!
तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करून खराब झालेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात द्राक्षाचे सेवन करावे. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. बद्धकोष्ठते, अपचन, गॅस, जेवलेले अन्नपदार्थ नीट न पचन होणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात फायबर युक्त पदार्थांचे नियमित सेवन केले पाहिजे.