
सध्याच्या धावपळीच्या जगात मानसिक आरोग्य सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे. याचमुळे संपूर्ण जग हे मेडीटेशनकडे वळत आहेे. सर्वसाधारण सांगितलं जातं की रोज मेडिटेशन करा पण किती आणि कधी मेडिटेशन करणं फायद्याचं आहे याबाबत आज सविस्तर जाणून घेऊयात.
मेडीटेशनचा असा ठराविक वेळ नाही मात्र तुम्ही जर नुकतीच सुरुवात करत असाल तर रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं करणं फायदेशीर ठरतं. कधी कधी कामामुळे रोज मेडीटेशन करणं शक्य होत नाही. त्यामुळे बरेचजण आठवड्यातून एकदा ताासभर ध्यानाला बसणारे अनेकजण आहेत. मात्र तज्ज्ञ हेच सांगतात की, आठवड्यातून एकदा मेडीटेशन करण्यापेक्षा रोज दिवसातून 10 मिनिटं जरी ध्यान केलं तर त्याचा खूप जास्त फायदा होतो.
ध्यान करणं हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ध्यानाची पद्धत अतिशय सोपी आहे. रोज सकाळी उठल्यावर चांगल्या वातावरणात दिर्घ श्वास घ्या. ध्यान करताना सर्व लक्ष श्वासांकडे असावं. ध्यानामुळे डोकं आणि मन शांत राहतं. तुम्ही सकाळीच ध्यान करायला हवं असं नाही संध्याकाळी देखील शांत वेळेत करु शकता. मात्र रोज सकाळी ध्यान केलं तर त्याचे फायदे अधिक आहे. सकाळी उठल्यावर मेंदू जास्त अॅक्टिव्ह असतो. सकाळच्या वातावरणात सकारात्मकता अधिक असते. त्यामुळे हा वेळ ध्यानासाठी उत्तम आहे.
जसं आपण शरीराची काळजी घेतो तशीच काळजी मानसिक आरोग्याची घेणं देखील गरजेचं आहे. मेडिटेशन म्हणजे अतिविचार नियंत्रणात आणण्यासाठी केलेला उपाय. दिवसभरात अनेक विचार डोक्यात येत असतात. त्यातले 60 ते 70 टक्के विचार हे नकारात्मक आणि निर्रथक असतात. या अतिविचारांमुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि त्याचा परिणाम हा शरीरावर देखील दिसायला लागतो. म्हणूनच दिवसभरातून किमान 10 मिनिटं स्वत:साठी वेळ काढणं महत्वाचं आहे.
Ans: संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) डिसेंबर 2024 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार 21 डिसेंबर हा दिवस World Meditation Day म्हणून साजरा केला जातो.
Ans: मानसिक आरोग्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं तणाव, चिंता, डिप्रेशन याविषयी जागृती निर्माण करणं मेडिटेशनद्वारे मन शांत ठेवण्याचं महत्त्व समजावणं
Ans: वाढती स्पर्धा (करियर व शिक्षण) कामाचा ताण मोबाईल व सोशल मीडियाचा अतिवापर झोपेचा अभाव सततचे नकारात्मक विचार