मासिक पाळी येण्याआधी महिलांच्या शरीरात दिसून येतात 'हे' गंभीर संकेत
मासिक पाळी म्हणजे काय?
पाळीचे चक्र किती दिवसांचे असते?
मासिक पाळी येण्याआधी शरीरात दिसून येणारी लक्षणे?
प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येणे हे स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक चक्र आहे. पालीचा कालावधी साधारणता ५ ते ६ दिवसांचा असतो. दर महिन्याला स्त्रियांच्या गर्भाशयातून रक्तस्त्राव होतो, जो गर्भधारणेसाठी तयार झालेल्या गर्भाशयाच्या अस्तराचा भाग असतो. मासिक पाळीचे चक्र चाट टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. मासिक पाळी, फॉलिक्युलर, ओव्हुलेशन आणि ल्यूटियल ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स नियंत्रित होतात. पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना असह्य वेदना, कंबर दुखणे, पाठ दुखणे, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवू लागतात. ही लक्षणे मासिक पाळी आल्यानंतर दिसून येतात. पण काहींना मासिक पाळी येण्याआधी सुद्धा गंभीर संकेत दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी येण्याआधी शरीरात कोणते संकेत दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळी येण्याच्या काही दिवसाआधी महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल दिसू लागतात. यामध्ये प्रामुख्याने इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन बदलू लागतात. केवळ शारीरिक नाहीतर मानसिक बदल होण्याची सुद्धा शकता असते. मासिक पाळीचा परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे जीवनशैलीत होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी स्तनांमध्ये जडपणा किंवा हलका स्पर्श झाल्यानंतर खूप जास्त वेदना होतात. शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स वाढल्यामुळे दुग्धग्रंथींमध्ये सूज येऊन स्तनांमध्ये वेदना होतात. हा त्रास पाळी येण्याच्या आधी होतो आणि पाळी आल्यानंतर हळूहळू कमी होतो. पण वारंवार स्तनांमध्ये वेदना होत असतील दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पाळी येण्याच्या काही दिवसाआधी बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, ऍसिडिटी इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. याशिवाय काहींना जुलाब देखील होतात. ‘प्रोस्टाग्लँडिन्स’ नावाचे रसायन गर्भाशयासोबतच आतड्यांच्या हालचालींवर परिणाम करते. यामुळे काहीवेळा पोट फुगणे, पोटात जडपणा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. हार्मोन्सच्या चढ उतारामुळे शरीराचे तापमान बदलते. ज्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप येत नाही. तसेच संपूर्ण दिवस प्रचंड थकवा आणि सुस्ती जाणवू लागते. याला वैद्यकीय भाषेत Period Fatigue असे म्हणतात.
मासिक पाळी येण्याआधी आवर्जून दिसणारे लक्षण म्हणजे चेहऱ्यावर किंवा हनुवटीवर फोड येणे. हनुवटीवर किंवा जबड्याच्या रेषेवर अचानक पिंपल्स आल्यास समजून जावे की मासिक पाळी येऊ शकते. ओव्हुलेशननंतर त्वचेतील सीबम उत्पादन वाढू लागते, ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात.
Ans: मासिक पाळीचा भाग म्हणून गर्भाशयाच्या अस्तरातून होणारा रक्तस्त्राव.
Ans: साधारणपणे मुली १२-१३ वर्षांच्या झाल्यावर मासिक पाळी सुरू होते, पण काहीवेळा आधी किंवा उशिराही सुरू होऊ शकते.
Ans: पाळी २१ दिवसांपेक्षा कमी किंवा ३५ दिवसांपेक्षा जास्त वेळा येत असेल तर ती अनियमित मानली जाते.






