वाढत्या स्क्रीन टाईममुळे फक्त ६ तासांची झोप होते? आरोग्यासंबंधित उद्भवेल 'या' गंभीर आजारांचा धोका
६ तासांची झोप घेतल्यास आरोग्यावर होणारे परिणाम?
अपुऱ्या झोपेमुळे उद्भवणारे आजार?
नियमित किती तासांची शांत झोप घ्यावी?
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल, लॅपटॉप कायमच असतो. डिजिटल युगात झपाट्याने अनेक गोष्टींमध्ये बदल होत आहेत. मोबाईल, लॅपटॉपचा वापर गेम खेळण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी, ऑफिसची काम इत्यादी अनेक गोष्टींसाठी केला जातो. मोबाईलशिवाय लहान मुलांचे पान हलत नाही. त्यांना कायमच जेवणताना किंवा घरातील अतिशय सामान्य गोष्टी करताना सुद्धा मोबाईल लागतो. पण अतिप्रमाणात मोबाईल, लॅपटॉपचा वापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अतिप्रमाणात मोबाईल वापरामुळे झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते. याशिवाय ६ तासांपेक्षा खूप कमी झोप झाल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर नेमका कोणता परिणाम दिसून येतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. शांत आणि आरामदायी झोप घेतल्यास संपूर्ण आरोग्य कायमच हेल्दी राहाल. याशिवाय मानसिक तणाव कमी होऊन तुम्ही फ्रेश राहाल. डॉक्टरांच्या मते, एखादी व्यक्ती ६ तासांपेक्षा कमी वेळ झोपत असेल तर तिच्या मेंदूवर परिणाम होण्याची खूप जास्त शक्यता असते. तसेच शरीराचे वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. डाएट किंवा व्यायामन केल्यानंतर सुद्धा कोणताही फरक द
दिसून येत नाही. त्यामुळे नेहमीच ७ ते ८ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणे आवश्यक आहे. याशिवाय शरीरातील हार्मोन्समध्ये बिघाड होऊन जातो.
अपुऱ्या झोपेचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. कमी झोप घेतल्यामुळे घ्रेलिन हा भूक वाढवणारा हार्मोन वाढत जातो, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा निर्माण होते. भूक लागल्यानंतर जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते. ओव्हरईटिंगची सवय लागल्यानंतर ती लवकर कमी होत नाही. तर शरीरातील लॅप्टिन हार्मोनची पातळी कमी होऊन जाते. या हार्मोनची पातळी कमी झाल्यानंतर कितीही खाल्लेले तरीसुद्धा समाधान वाटतं नाही. खूप जास्त खाण्याची इच्छा निर्माण होते.
कमी झोपल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढत जाते. स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. जास्त कॉर्टिसोलमुळे पोटाभोवती चरबी जमा होऊन लठ्ठपणा वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन सेंसिटिव्हिटी कमी होऊन जाते, ज्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होण्याची जास्त शक्यता असते. वजन झपाट्याने वाढण्यास झोपेच्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात.
७ ते ८ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यामुळे मेंदूचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. सतत चिडचिड, थकवा, अशक्तपणा वाढून शारीरिक तणाव वाढण्याची शक्यता असते. अशावेळी गोड, तळलेले आणि जंक फूड खाण्याची खूप जास्त इच्छा होते. मेंदूचे आरोग्य बिघडल्यानंतर दैनंदिन जीवनातील छोटी मोठी कामे करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते.
Ans: दररोज एकाच वेळी झोपायला जा आणि उठा.
Ans: अंथरुणातून उठा. २०-३० मिनिटांनी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करा. काहीतरी आरामशीर करा (उदा. पुस्तक वाचणे).
Ans: प्रौढांसाठी साधारणपणे ७-९ तासांची झोप आवश्यक असते. झोपेचे टप्पे आणि वय यानुसार ते बदलते.






