Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

योगा से होगा! ब्लड प्रेशरचा त्रास आहे? तर करा योगसाधना

योगसाधना उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, तणाव कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान केल्याने रक्तदाब संतुलित राहतो आणि शरीर-मन शांत राहते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 16, 2025 | 10:49 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अयोग्य जीवनशैली आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने ब्लड प्रेशरची समस्या वाढते. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला उच्च रक्तदाब (BP) असेल, तर पुढच्या पिढीतही ही समस्या होण्याची शक्यता असते. भारतीयांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, भारतातील प्रत्येक चौथा प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. ICMR-इंडिया डायबिटीजच्या अभ्यासानुसार, भारतात सुमारे 3.15 कोटी लोक उच्च बीपीचे रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत, योगासने करून औषधांशिवाय बीपी नियंत्रणात ठेवता येईल का? नियमित योगसाधना करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगामुळे अनेक प्रकारच्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. तज्ज्ञांच्या मते, योग हा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. योगामुळे केवळ तणाव कमी होत नाही, तर शरीर आणि मन शांत राहते, जे बीपी नियंत्रणासाठी आवश्यक आहे. योगगुरूंच्या म्हणण्यानुसार, योगामध्ये विविध शरीराच्या मुद्रांचा, श्वास नियंत्रणाचा आणि ध्यानाचा समावेश होतो, ज्यामुळे तणाव कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो.

चीनमध्ये सापडला नवा Batvirus; माणसांची करू शकतो शिकार, दुसऱ्या महामारीचे सावट?

योगसाधनेचे अनेक फायदे आहेत. योग तणाव कमी करण्यास मदत करतो, जो उच्च रक्तदाब वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. तसेच, योगामुळे रक्तदाब कमी होतो आणि बीपी नियंत्रणात राहतो. शिवाय, योग हृदयाचे आरोग्य सुधारतो, ज्यामुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. बीपी नियंत्रणासाठी काही प्रभावी योगासने नियमित केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहू शकतात. फॉरवर्ड फोल्ड पोज ही एक उत्तम योगमुद्रा आहे, जी रक्तप्रवाह नियंत्रित करण्यात मदत करते तसेच तणाव व चिंता कमी करून मेंदूला शांत करते. ही मुद्रा केल्याने मेंदूला अधिक रक्तपुरवठा होतो आणि संपूर्ण मज्जासंस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

विपरीत करणी मुद्रा, म्हणजेच पाय भिंतीला लावून वर उचलण्याची मुद्रा, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. ही आसन शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे कार्यरत ठेवते आणि हृदयावरचा ताण कमी करते. विशेषतः हाय बीपीच्या रुग्णांसाठी ही मुद्रा अत्यंत उपयुक्त आहे, कारण ती मेंदूला शांतता देऊन शरीरातील तणाव दूर करण्यास मदत करते. बालासन ही हलकी आणि आरामदायक मुद्रा आहे, जी शरीर आणि मन दोन्ही शांत ठेवते. ही मुद्रा पाठीच्या कण्याला आणि मज्जासंस्थेला विश्रांती देते, ज्यामुळे रक्तदाब नैसर्गिकरीत्या नियंत्रित राहतो. याशिवाय, शवासन ही संपूर्ण शरीराला विश्रांती देणारी मुद्रा आहे. या आसनामुळे शरीर आणि मन शांत राहत असल्याने हृदयाचे ठोके नियंत्रित होतात आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

कॉफीत केळं मिक्स करून पिण्याचे अफलातून फायदे, 1 समस्या दूर करण्यासाठी South Korea मध्ये झाली सुरूवात

श्वसनासंबंधी तंत्रांमध्ये नाडी शोधन प्राणायाम अत्यंत प्रभावी मानले जाते. ही श्वसन प्रक्रिया उजव्या आणि डाव्या नाकपुड्यांमधून संतुलित श्वास घेण्यावर आधारित असते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. परिणामी, तणाव कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो. याशिवाय, ध्यान नियमित केल्याने शरीर आणि मन अधिक शांत राहते, त्यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि रक्तदाब नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहतो. नियमित योगसाधना आणि श्वसन तंत्रे आत्मसात केल्याने तुम्ही तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकता आणि अधिक निरोगी, आनंदी जीवन जगू शकता!

Web Title: Yoga poses for blood pressure problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • blood pressure
  • interesting yoga
  • world yoga day

संबंधित बातम्या

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल
1

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका! हृद्यासंबंधित आजारापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी
2

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका! हृद्यासंबंधित आजारापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
3

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

High Blood Pressure वरील रामबाण उपाय आहे Japanese Trick, रोज केल्याने रक्तदाब नेहमी राहील नियंत्रणात
4

High Blood Pressure वरील रामबाण उपाय आहे Japanese Trick, रोज केल्याने रक्तदाब नेहमी राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.