
Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर
उच्च रक्तदाब म्हणजे काय?
हायपरटेंशनमुळे कोणत्या आजारांची लागण होते?
मधुमेह उच्च रक्तदाब शरीरासाठी का घातक ठरतो?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचे कमी सेवन, अपुरी झोप, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात वाढलेला मानसिक आणि शारीरिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर संपूर्ण शरीरात बदल दिसून येतो. सायलेंट किलर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि कोणत्याही क्षणी स्ट्रोक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यामुळे भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मधुमेह, मायग्रेन किंवा हृदयरोगासारखे आजार वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हायपरटेंशन म्हणजे काय? याचा शरीरावर कसा परिणाम होतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
ज्यावेळी धमन्यांमध्ये रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा जास्त असतो त्याला उच्च रक्तदाब असते म्हंटले जाते. साधारणपणे, १२०/८० मिमीएचजी रक्तदाब अतिशय सामान्य मानला जातो. पण याशिवाय रक्तदाब जास्त असेल तर शरीरासाठी धोक्याचे ठरते. उच्च रक्तदाब ही आरोग्यासाठी अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे मेदूंसह हृदयाचे आरोग्य सुद्धा क्षणात बिघडू शकते. वाढत्या उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांचे आजार होण्याची जास्त शक्यता असते.
जगभरातील असंख्य लोक मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर ती पुन्हा नियंत्रणात ठेवणे खूप जास्त कठीण असते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा दोन्ही समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका जास्त असतो. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात न ठेवल्यास किडनीसह शरीरातील इतर अवयवांना हानी पोहचते.
फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा
मायग्रेनची समस्या उद्भवल्यानंतर तीव्र डोकेदुखी, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच रक्तदाब वाढल्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर जास्तीचा तणाव येतो. यामुळे कोणत्याही क्षणी रक्तवाहिन्या फुटू शकतात. याशिवाय मायग्रेन असलेल्या रुग्णांनी जास्त काळ उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नये. थंडीच्या दिवसांमध्ये नियमित गुळाचे पाणी प्यावे. यामुळे शरीरात साकारात्मक बदल दिसून येतील.
Ans: mmHg / m m H g किंवा त्याहून अधिक वाचन हे स्टेज २ चे उच्च रक्तदाब आहे
Ans: तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, दृष्टी अंधुक होणे किंवा छातीत दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: आहारात मीठ (सोडियम) कमी करा आणि ताजी फळे/भाज्या (पोटॅशियमयुक्त) वाढवा.