महिलांमध्ये वाढता कॅन्सर, काय आहेत कारणे (फोटो सौजन्य - iStock)
तरुणींमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, ५० वर्षांखालील महिलांना पुरुषांच्या तुलनेत कर्करोग होण्याची शक्यता ८२% जास्त आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार, ही वाढ २००२ मध्ये पुरुषांपेक्षा ५१% जास्त होती, ती २०२१ मध्ये ८२% जास्त झाली आहे. या चिंताजनक आकडेवारीत स्तनाच्या कर्करोगाची भर पडली आहे, ज्यामध्ये २०१२ ते २०२१ पर्यंत दरवर्षी १% वाढ झाली आहे, ५० वर्षांखालील महिलांमध्ये दरवर्षी १.४% वाढ दिसून येत आहे.
या अभ्यासात वाढत्या प्रवृत्तीला कारणीभूत ठरणारे अनेक जोखीम घटक आहेत, ज्यात शरीराचे वजन वाढणे, उशिरा गर्भधारणा होणे आणि कमी मुले असणे यांचा समावेश आहे. महिलांना साधारण ५० वयाच्या आधीच कॅन्सर होण्याचे प्रमाण सध्या वाढल्याचे दिसून येत असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे (फोटो सौजन्य – iStock)
महिलांमधील कॅन्सरचे प्रकार
गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे, अभ्यासात ते “वाढत्या मृत्युदर असलेल्या काही कर्करोगांपैकी एक” असल्याचे अधोरेखित केले आहे. २०१३ ते २०२२ पर्यंत, मृत्युदर दरवर्षी १.५% ने वाढला. त्याचप्रमाणे, ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमाण दरवर्षी २.४% ने वाढले आहे, तर मृत्युदर दरवर्षी १% ने वाढत आहे. १९९० च्या दशकाच्या मध्यापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान दरवर्षी १% ने स्थिरपणे वाढले आहे आणि मृत्युदरदेखील वाढत आहे, जरी तो कमी वेगाने झाला असला तरीही त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी
काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे
रेबेका एल, अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या साथीच्या रोगतज्ज्ञ आणि अहवालाच्या प्रमुख लेखिका यांनी सांगितले की, “हे त्रासदायक ट्रेंड महिलांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येतात,” रेबेका एल. सेगेल यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
“काही कर्करोग पुरुषांमध्येही वाढत असले तरी, हा कल असमान आहे, महिलांमध्ये ही वाढ अधिक लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे,” असे मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील ऑन्कोलॉजिस्ट, एमडी, नील अय्यंगार म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की, अनेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये, विशेषतः तरुणींमध्ये वाढ होत असल्याने, लोकसंख्या अनुवंशशास्त्राच्या पलीकडे मोठे घटक असू शकतात.
महिलांमधील कर्करोगाचे कारण
जीवनशैलीच्या सवयी जसे की आरोग्याला हानी पोहचवणारे खाणे, झोपेची कमतरता, धूम्रपान किंवा व्हेपिंग आणि मद्यपान, तसेच पर्यावरणीय घटक देखील कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरू शकतात. रेबेका एल. सिगल यांनी खात्रीपूर्वक सांगितले की, “अनेक लोकांना हे कळत नाही की त्यांचा कर्करोगाच्या जोखमीवर किती प्रभाव पडतो. आपल्याकडे बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे धूम्रपान सोडणे.” या बदलामुळे महिलांमधील कॅन्सररचे प्रमाण कमी होऊ शकते.
शरीरात सर्व्हायकल कॅन्सर घुसलाय सांगणारे 4 संकेत, मणक्याचे हाड होते डॅमेज; करू नका दुर्लक्ष