Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 21, 2025 | 10:54 PM
राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला

राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालं. भाजपने 132 जागांवर विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, केंद्रातील भाजप सरकार हे घटकपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे, केंद्रातील सरकार स्थीर ठेवण्यासाठी मोदींना एनडीएमधील घटकपक्षांना सोबत घेऊन जावं लागणार आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्या चर्चांना अर्थ नसल्याचं स्वत: शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

देशात ज्या मोठ्या राजकीय उलथापालथ होणार आहेत, त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच, आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून त्यांची मोघलाई निती आहे. आपल्यापासून लांब चालला की कापून टाकायचं असं हे मुघलांचे बच्चे आहेत, असा टोला कडू यांनी भाजपला लगावला. राज्यात आलेलं सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे,असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला. योजनांमध्ये 4-5 टक्के भ्रष्टाचार होतच असतो, असे विधान माणिकराव कोकाटे यांनी केले होते.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना बच्चू कडू यांनी वेगळंच गणित मांडलं. जेव्हा मोठे नेते नाराज असतात, तेव्हा समजायचे की ते अतिशय खुश असतात आणि जेव्हा ते अतिशय खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावा कडू यांनी केला. राज्यातील दोन जिल्ह्यांतील पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये वाद पाहायला मिळथ आहे. पालकमंत्रीबाबत ज्या पद्धतीने वाद सुरू आहेत हे पाहता आता भाजप राज्यभर एकट्याचे पालकमंत्री बनवेल असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: %e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6 %e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5 %e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 10:54 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • Maharashtra Politic

संबंधित बातम्या

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा
1

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा
2

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले
3

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले

एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना; दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता, नक्की काय घडतंय?
4

एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना; दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता, नक्की काय घडतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.