
1 application filed for the post of Mayor and 4 for the post of Corporator in Vadgaon Maval political news
Maharashtra Local Body Election : वडगाव मावळ : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील निवडणूका जाहीर केल्या आहेत. यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. निवडणूका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी देखील मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन प्रक्रिया वेग घेत असून दि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी एकूण ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली. नगराध्यक्ष पदासाठी भाजप-महायुतीच्या मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगरसेवक पदाकरिता दाखल झालेले अर्ज
प्रभाग क्रमांक ५ मधून भाग्यश्री सतिश गाडे, प्रभाग क्रमांक म्हणून रेखा विलास दंडेल त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ७ मधून चंद्रजित दिनकर वाघमारे आणि प्रभाग क्रमांक ३ योगेश सतीश तुमकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे वडगाव मावळमध्ये एकूण ४ नगरसेवक पदांचे अर्ज आज दाखल झाले. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक नामनिर्देशन सादर करण्याची मुदत आता अंतिम टप्प्यात आली असून केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. अंतिम दिवसांत संगणक प्रणालीवर संभाव्य वाढलेल्या ताणामुळे आणि सर्व उमेदवारांना समान संधी देण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
१५ ते १७ नोव्हेंबर २०२४ या तीनही दिवसांत रविवार, दि. १६ नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशीसुद्धा उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. दुपारी ३.00 वाजेपूर्वी नामनिर्देशन कक्षाच्या प्रवेशद्वाराच्या आत उपस्थित असणे बंधनकारक आहे. उमेदवारांना सोयीसाठी आयोगाने ऑनलाईन (संकेतस्थळावर) तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) दोन्ही माध्यमातून नामनिर्देशन दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
मोठा राजकीय धक्का : राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवक तालुकाध्यक्षांचा भाजपात प्रवेश
वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल वहिले आणि वडगावच्या माजी उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विशाल वहिले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपसरपंच पदावर कार्यरत होते, तर पूजा वहिले यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. आज महायुतीमध्ये प्रवेश करून त्यांनी स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण केली आहेत. भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमासोबत झालेला हा प्रवेश स्थानिक राजकारणाचा ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.