शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालावर प्रतिक्रिया दिली (फोटो- सोशल मीडिया)
Bihar Elections 2025: मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. बिहारमध्ये एनडीचा तुफान विजय झाला. भाजपने बिहारमध्ये विजयश्री खेचून आणला. बिहारमध्ये कॉंग्रेस आणि आरजेडीचा धुव्वा उडाला. आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार राजकीय भाष्य केले. तसेच भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. एझिक्ट पोलपेक्षाही वेगळा निकाल बिहारमधून आला. जोरदार प्रचारानंतरही विरोधकांचा यामध्ये सुपडा साफ झाला. यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये राजकीय विषयांवर भाष्य केले. आमदार चषक लोगो अनावरण सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, “बिहारचाही संघ खेळायला येणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, जो जिता वही सिकंदर. पण सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकले नाही. जे जिंकले त्यांचं अभिनंदन. निवडणुकीत तेजस्वीच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होती. ती खरी होती की दिसायची होती हे कळायला मार्ग नाही. ज्याच्या सभेला अलोट गर्दी असते त्याचं सरकार येत नाही,” असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी दिला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी त्यांनी बिहारमध्ये लागलेल्या निकालावर देखील पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, “पण ज्यांच्या सभेत खुर्च्या खाली होत्या त्यांचं सरकार येतं, हे कळण्याच्या पलिकडचे आहे. 10 हजार दिले हा एक फॅक्टर आहे. त्याने काही फरक पडला आहे. पण रोज लोक जे भोगत आहेत. त्यांच्या मनातून अजून जात नाही. हरकत नाही जो जिता वही सिकंदर आहे. बहूमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही. महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर नेता निवडायला त्यांनी काही वेळ घेतला,” असे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी डागले.
बिहार विधानसभा निवडणुकीबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “बिहारची निवडणूक हे अनाकलनीय गणित आहे. त्यावेळी मुद्दा उचलला होता. मतदार यादीतून 65 लाख नावं वगळली. ती परत घेतली की नाही माहीत नाही. आम्ही मोर्चा काढला. दुबार नोंदणी, बोगस पत्त्यावर आम्ही बोललो. पण निवडणूक आयोग काही बोलत नाही. ढिम्म आहे. त्यामुळे या प्रक्रियेला लोकशाही मानायची का. आमचा निवडणुकीला विरोध नाही. निवडणूक लोकशाहीचा जीव आहे. पण असा प्रकार मानायचा का? निवडणूक आयोग काही उत्तर द्यायला तयार नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हणाल आहेत.






