Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार परीक्षा

पहिल्या दिवसापासूनच भरारी पथक सक्रिय राहणार आहे. ग्रामीण भागात, केंद्रप्रमुखांना बोर्डाने कडक सूचना जारी केल्या आहेत. जर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळले तर कठोर कारवाई होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2025 | 07:13 AM
आता शाळांमध्ये 'सीबीएसई पॅटर्न'

आता शाळांमध्ये 'सीबीएसई पॅटर्न'

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात बारावी बोर्ड परीक्षा सुरु असतानाच आता आजपासून दहावी परीक्षा सुरु होत आहे. यंदा राज्यातील 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दिली आहे. याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव तोंडी परीक्षा देता आली नाही त्यांना ‘आऊट ऑफ टर्न’ या परीक्षेमार्फत त्यांची चुकलेली तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा 18 मार्च ते 20 मार्च या कालावधीत देता येणार आहे.

यावर्षी राज्यात १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून, यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० विद्यार्थी आणि ७ लाख ४७ हजार ४७१ विद्यार्थिनी आहेत. याशिवाय १९ तृतीयपंथी विद्यार्थीही यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत. मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर त्या खालोखाल पुणे विभागातून २ लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा कोकण विभागातून सर्वात कमी २७ हजार ३९८ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

कॉपी केल्यास गुन्हा

कॉपीमुक्त अभियानातर्गत कॉपी करणाऱ्या आणि त्यात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा परीक्षेच्या काळात केंद्राच्या ५०० मीटर परिसरामध्ये सगळी झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याचे आदेशही मंडळामार्फत देण्यात आले आहे.

पहिल्या दिवसापासूनच भरारी पथक सक्रिय

पहिल्या दिवसापासूनच भरारी पथक सक्रिय राहणार आहे. ग्रामीण भागात, केंद्रप्रमुखांना बोर्डाने कडक सूचना जारी केल्या आहेत. जर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळले तर कठोर कारवाई होणार आहे. यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला.

21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होत आहे. यंदा विभागातून 1 लाख 51 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1 लाख 54 हजार 724 होती. यावेळी 3,353 विद्यार्थी कमी झाले आहेत. परीक्षेसाठी विभागात एकूण 682 केंद्रे आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 676 होती. विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र मिळावे, यासाठी केंद्रे वाढविले गेले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांना होम सेंटर

यंदा मंडळ प्रथमच एक नवीन प्रयोग करून पाहणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गृह केंद्रे मिळाली आहेत. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसाठी केंद्रे वर्णक्रमानुसार निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे, सुमारे 20 ते 30 टक्के विद्यार्थ्यांना गृह केंद्रे मिळाली आहेत. बारावीप्रमाणेच दहावीच्या वर्गातही केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक बदलण्यात आले आहेत. परंतु सर्व केंद्रांवर ही व्यवस्था नाही.

Web Title: 10th maharashtra board exam started from today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 07:13 AM

Topics:  

  • 10th Board Exam
  • maharashtra board

संबंधित बातम्या

CBSE च्या शाळा 9 जूनपासून होणार सुरु तर राज्य मंडळाच्या शाळा…
1

CBSE च्या शाळा 9 जूनपासून होणार सुरु तर राज्य मंडळाच्या शाळा…

SSC Result Latur : दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नची यशाची परंपरा कायम
2

SSC Result Latur : दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नची यशाची परंपरा कायम

राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज; दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार जाहीर
3

राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज; दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार जाहीर

SSC Board exam result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! या तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल
4

SSC Board exam result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! या तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.