Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024: सलग 11 वेळा विजयाचा रेकॉर्ड; पण यावेळी ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार

माढा मतदारसंघातून सलग सहा वेळा विजयी झालेले राष्ट्रवादीचे नेते बबनराव शिंदे यांनी यावेळी निवडणूक लढवणार नाहीत. यावेळी त्यांचे पुत्र रणजित शिंदे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 12, 2024 | 12:05 PM
Maharashtra Election 2024: सलग 11 वेळा विजयाचा रेकॉर्ड; पण यावेळी ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: गेल्या पाच वर्षातील राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे केवळ राज्याचे, देशाचेच नव्हे तर अनेक परदेशीयांचेही लक्ष लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल काय लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या आणि सत्तापरिवर्तनही झाले पण सत्ताविरोधी लाट आली की मोठ-मोठ्या दिग्गजांचाही पराभव झाला. आजही राज्याच्या राजकारणात असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांना सत्ताविरोधाचा, राम लाटेचा आणि मोदी लाटेचा कधीही फटका बसला नाही.

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही असे 11 मोठे राजकारणी आहेत, जे गेल्या पाच निवडणुकांमध्ये सातत्याने विजयाचा झेंडा फडकवत आहेत. गेल्या 7 निवडणुकीत अपराजित राहिलेले तीन आमदार आहेत. अशा विक्रमी आमदारांमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही समावेश आहे, ते 1985 पासून सलग 8 वेळा संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि यावेळी पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

 

हेही वाचा: Mumbai Politics: मुंबईचा गड जिंकण्यासाठी ठाकरे गटाचा खास प्लॅन; अनिल परबांनी सांगितली रणनीती

 गणपतराव अण्णासाहेब देशमुख 11 वेळा विजयी

महाराष्ट्रात शरद पवार, अजित पवार, गिरीश महाजन आणि मंगल प्रभात लोढा यांच्यासारखे नेते आहेत, जे कधीही निवडणूक हरले नाहीत. राज्यात सर्वाधिक विजयाचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांच्या नावावर आहे. अण्णासाहेब देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर 11 वेळा विजयी झाले. या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांना 1972 आणि 1995 मध्ये दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले. 1995 मध्ये त्यांचा त्यांच्या नातवाकडून अवघ्या 190 मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या मोदी लाटेतही त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. 1978 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा ते त्यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते.

*निवडणुकीतील अजिंक्य उमेदवार कोण?

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात – संगमनेरचे 8 वेळा आमदार असलेले,  यावेळी 9व्यांदा निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील – इस्लामपूरमधून सात वेळा निवडणूक जिंकलेले, 1990 पासून ते अजिंक्य झाले आहेत.

दिलीप वळसे पाटील – आंबेगावमधून सलग 7 वेळा विजयाचा विक्रम, अद्याप निवडणूक हरलेली नाही

अजित पवार – राष्ट्रवादीचे अध्यक्ष 1990 पासून बारामतीचे आमदार आहेत.

 

हेही वाचा:  रुपाली गांगुलीने सावत्र मुलगी ईशाला पाठवली कायदेशीर नोटीस

*नवव्या विजयासाठी बाळासाहेब थोरात सज्ज

संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात हे नवव्यांदा विजयाचे ध्येय बाळगून आहेत. आपल्या विजयाचा आत्मविश्वास बाळगून बाळासाहेब थोरात म्हणाले की, यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूरदृष्टी आणि त्यानंतर प्रामाणिक मेहनत आवश्यक आहे. विजयाचा आनंद साजरा केल्यानंतर मी लगेचच जनतेमध्ये जातो आणि पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करतो.  विजयासाठी काम करणाऱ्या लोकांना भेटतो. बाळासाहेब थोरात यांच्याशिवाय आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आणि इस्लामपूरमधून जयंत पाटील यांनीही सलग सात वेळा विजय मिळवला आहे. 1990 पासून या दोन्ही नेत्यांनी  नेहमी विधानसभेत विजयाची पताका फडकावली आहे.

*सलग सहा वेळा विजयी राहिलेले नेते

नंदुरबारचे भाजप आमदार विजयकुमार गावित

जामनेरचे भाजपचे आमदार गिरीश महाजन

मलबार हिल येथील भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा

राष्ट्रवादीचे आमदार माधव बबनराव शिंदे (निवडणूक न लढवत)

शिर्डीतील भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील

 

हेही वाचा: विक्रांत मॅसीने या क्रिकेट खेळाडूच्या बायोपिकमध्ये भूमिका करण्याची व्यक्त केली इच्छा

*अजित पवारही अजिंक्य पुतण्याचं आव्हान

बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवमारे उपमुख्यमंत्री अजित पवार  हेही आतापर्यंत अजिंक्य राहिले आहेत. 1991 मध्ये बारामतीतून पहिल्यांदा निवडणूक जिंकलेल्या अजित पवारांनी आतापर्यंत सलग सात वेळा विजय मिळवला आहे. यावेळी ते आठव्यांदा निवडणूक लढवत असून यावेळी त्यांची स्पर्धा पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी आहे.

माढा मतदारसंघातून सलग सहा वेळा विजयी झालेले राष्ट्रवादीचे नेते बबनराव शिंदे यांनी यावेळी निवडणूक लढवणार नाहीत. यावेळी त्यांचे पुत्र रणजित शिंदे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय 1995 पासून आपापल्या मतदारसंघात अपराजित राहिलेले पाच आमदार असून त्यात शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील, नंदुरबारमधून विजयकुमार गावित, जानमेरमधून भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांचा समावेश आहे.

*सलग पाचवेळी विजयी राहिलेले नेते

काँग्रेसचे देवळीचे आमदार रणजित कांबळे

कराड उत्तरमधून शरद गटाचे बाळासाहेब उर्फ ​​श्यामराव पाटील

कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ

 

हेही वाचा: सर्व भाज्यांवर भारी पडेल हे आलं-लसूण-मिरचीचं लोणचं! लगेच रेसिपी नोट करा

*वारसा आणि साखर कारखानेच ठरले सततच्या विजयाचे कारण

सातत्याने विजयी होणाऱ्या नेत्यांच्या विजयात कुटुंबाचा वारसा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या व्यतिरिक्त हे नेते कोणत्या ना कोणत्या प्रकारे साखर कारखाने, शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांशी संबंधित आहेत, त्यामुळे ते आपल्या मतदारांच्या सतत संपर्कात असतात. या नेत्यांनी आव्हानकर्त्यांना त्यांच्या भागात राजकीय उत्कर्षाची संधीही दिली नाही. ज्या भागात मोठे नेते जिंकतात, तेथे मूलभूत समस्या कमी असतात, त्यामुळे सत्ताविरोधी प्रभाव पडत नाही.

 

Web Title: 11 consecutive winning streak but this time the reputation of these leaders will be at stake nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • jayant patil
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान
1

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.