(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. सावत्र मुलगी ईशा वर्माने रुपाली गांगुलीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. रुपाली ही तिचे वडील अश्विन वर्मा यांची तिसरी पत्नी असून त्यांचा मुलगा रुद्रांश हा देखील अवैध असल्याचा दावा ईशाने केला आहे. रुपाली गांगुलीचे पती अश्विन के वर्मा यांनी आधीच मौन तोडून या प्रकरणाबद्दल सांगितले आहे, परंतु चाहते रुपाली गांगुलीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते, जे आता संपले आहे. रुपाली गांगुली ॲक्शन मोडमध्ये आली आहे. अभिनेत्रीने तिच्या सावत्र मुलीवर कायदेशीर कारवाई केली आहे.
अभिनेत्री रुपाली गांगुली हिने तिची सावत्र मुलगी ईशा वर्मा हिला मानहानीची नोटीस बजावली असून तिच्या चारित्र्याला आणि वैयक्तिक आयुष्याला “अपमानित” केल्याबद्दल ५० कोटी रुपयांची भरपाई अभिनेत्रीने तिच्या सावत्र मुलीकडे मागितली आहे. गांगुलीने ईशाची “खोटी आणि हानीकारक विधाने” म्हणजे तिच्या स्वत:च्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केलेल्या दाव्याला उत्तर म्हणून ही कायदेशीर नोटीस तिला पाठवण्यात आली आहे. अभिनेत्री गांगुली यांची वकील सना रईस खान यांनी तयार केलेल्या नोटीसमध्ये ५० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
हे देखील वाचा- Shahrukh Khan: शाहरूख खानला धमकी प्रकरणातील एक संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात
रुपाली गांगुलीने ईशा वर्माला पाठवली कायदेशीर नोटीस
नोटीसमध्ये असे लिहिले आहे: “आमच्या क्लायंटने असे म्हटले आहे की ट्विटर (X), इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्याद्वारे प्रकाशित केलेल्या पोस्ट आणि टिप्पण्या पाहून त्यांना धक्का बसला आहे. आमच्या क्लायंटने असे म्हटले आहे की हे खरे नाही. गांगुली या आरोपांमुळे मानसिकरित्या दुखावली गेली आहे, ज्यामुळे तिला वैद्यकीय मदत घ्यावी लागली आणि सेटवरील अपमान आणि कामाच्या संधी गमावण्यासह व्यावसायिक अडचणींना सामोरे त्यांना सामोरे जावे लागत आहे.’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
सुरुवातीला अभिनेत्रीने शांत राहून सगळे आरोप सहन करून घेतले परंतु आता गांगुलीला तिच्या आणि अश्विन वर्माच्या 11 वर्षाच्या मुलाला या प्रकरणात आणल्यानंतर कायदेशीर कारवाई करणे भाग पडले आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा देऊन ईशाने त्वरित माफी मागावी, अशीही या नोटीसमध्ये मागणी करण्यात आली आहे. नोटीस स्पष्ट करते की रुपाली गांगुली आणि अश्विन वर्मा 2009 मध्ये ईशाच्या आईपासून विभक्त होण्यापूर्वी 12 वर्षे मित्र होते. यात असेही नमूद केले आहे की गांगुली आणि अश्विन या दोघांनी फोटोशूट आणि ऑडिशनच्या संधींची व्यवस्था करून मनोरंजन उद्योगात एशाच्या प्रवेशाला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले.
हे देखील वाचा- वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’मध्ये सलमान खानचा दिसणार कॅमिओ, अभिनेता म्हणाला- ‘इफेक्ट महिनाभर दिसेल’!
हे प्रकरण कसे झाले सुरु
ईशाची जुनी फेसबुक कॉमेंट शेअर करून रेडिट पोस्टने लक्ष वेधले तेव्हापासून हा वाद सुरू झाला आहे. ज्यामध्ये तिने वडिलांचे तिच्या आईशी लग्न केलेले असताना देखील वडिलांसोबत रुपाली गांगुलीचे अफेअर असल्याचा आरोप केला आणि रुपालीला वाईट मनाची म्हणून जाहीर केले. व्हायरल पोस्टने अश्विनला X वर निवेदन जारी करण्यास प्रवृत्त केले आणि हे आरोप फेटाळले. तो पुढे ईशा म्हणाली, ‘रूपाली गांगुलीमुळे माझे कुटुंब तुटले आहे. मला धक्काच बसला होता. आजही मी माझ्या आई-वडिलांचा २४ वर्षा जुना फोटो माझ्यासोबत ठेवते.’ असे तिने सांगितले.