समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात दोनशे फूट खोल दरीत कार कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी सर्व लोणी काळभोर येथील रहिवासी असून दोन दिवसांपूर्वी कोकणात फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान महाबळेश्वर पाचगणी वाईमार्गे पुण्याला जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर मोटार क्र( एम एच१२ क्यूटी ७७११) खोल दरीत कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने व घाट उताराचा अंदाज न झाल्याने गाडी खोल दरीत कोसळली. यामध्ये बजरंग पर्वत काळभोर,वैभव काळभोर,सौरभ जालिंदर काळभोर अक्षय मस्कु काळभोर (सर्वजण लोणी काळभोर, पुणे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जखमींना खोल दरीतून दोरखंडाच्या साह्याने बाहेर काढले. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिली. त्यामुळे घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली.