Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli News: गडचिरोलीत वर्षभरात २०७५ क्षयरुग्णांची नोंद! आरोग्य विभागाचा धोक्याचा इशारा

२४ मार्च हा दिवस 'जागतिक क्षयरोग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९६२ पासून प्रस्थापित आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 24, 2026 | 05:10 PM
World TB Day 2026, Nikshay Poshan Yojana, World TB Day,

World TB Day 2026, Nikshay Poshan Yojana, World TB Day,

Follow Us
Close
Follow Us:
  • क्षयरोगाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे.
  • गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षभरात २०७५ क्षयरोगाचे रूग्णांची नोंद
  • दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, संध्याकाळी हलकासा ताप वजनात घट
Gadchiroli News: क्षयरोगाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशातील शासन आपले स्तरावर अथक प्रयत्न करीत आहे. राज्याचा शेवटचा टोक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षभरात २०७५ क्षयरोगाचे रूग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. वेळीच निदान झाल्यास सदर आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे आजार न लपविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले असून, मंगळवारी जागतिक क्षयरोग दिन साजरा करताना याबाबत नागरिकांनीही सजगतेने आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

नागपुरातील डंपिंग यार्डजवळ भीषण आग; आगीत 8 गोदामे जळून खाक

२४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९६२ पासून प्रस्थापित आहे. जिल्हा क्षयरोग केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा क्षयरोग दवाखान्यामध्ये हा कार्यक्रम
राबविला जात आहे. आरोग्य सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात अग्रेसर असलेली आरोग्य विभागाची यंत्रणा जिल्ह्यातील गावोगावी पोहचलेली आहे. त्यामुळे अनेक रोगाचे समूळ उच्चाटन करण्यात यश आले आहे. परंतु क्षयरोगावर
अद्यापही पूर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही, ही चिंताजनक बाब आहे. क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर उपचारार्थी रुग्णास दरमहा १००० रूपये निक्षय पोषण योजनेद्वारे औषधोपचार पूर्ण होईपर्यंत देण्यात येतात.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, संध्याकाळी हलकासा ताप वजनात घट होते, भूक मंदावने, छातीत दुखणे, धुंकीतून रक्त पडणे ही लक्षणे दिसून आल्यास क्षयरोगाचा संशयीत रुग्ण समजावा तसेच दूषित धुंकी, क्षयरोग रुग्णाच्या सहवासात असणारे व्यक्ती, कुपोषित, प्रतिकार शक्ती कमी असणारे व्यक्ती, मधुमेह असणारे व्यक्ती, दिर्घकालीन आजारी, वृद्ध व्यक्ती आदींना क्षयरोग आजार होण्याची शक्यता असते.

विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका; गारपिटीमुळे रब्बीतील गहू, मका पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

प्रत्येक नागरिकाने लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास क्षयरोग निर्मूलन शक्य आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्ण शोध मोहीम, घरभेटी, उच्च जोखमीच्या गटांची तपासणी आणि उपचार पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी दुर्लक्ष न करता जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. लवकर निदान, नियमित उपचार आणि सामाजिक सहकार्य, हीच क्षयरोगावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. – डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी,

 

Web Title: 2075 tb cases in one year gadchiroli health department on high alert amid world tb day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.