Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी 237 कोटीहून अधिक निधी मंजूर, जिल्हानिहाय निधीवाटपाची यादी जाहीर

राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी माहिती मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

  • By नारायण परब
Updated On: Sep 24, 2024 | 07:43 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतपीकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 237 कोटी हून अधिक निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.  याबाबत माहिती देताना मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील म्हणाले की,   राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.

सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली गेली आहे

मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान  स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या  नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या  आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले असून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली गेली आहे.

 यावर्षीच्या जून  ते ऑगस्ट  या कालावधीत अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबद्दल संबधित विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार  शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. 

जिल्हानिहाय निधीवाटप यादी

यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लाख

वर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लाख 

चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लाख

नागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लाख  

पुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लाख

सांगली जिल्ह्यासाठी १११३.२५ लाख

सातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लाख

अकोला जिल्ह्यासाठी १२९०.१७ लाख

यवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लाख 

बुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लाख

 वाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लाख

अमरावती  जिल्ह्यासाठी ५१.०१ लाख 

एकूण  २३७ कोटी ७ लाख १३ हजार रुपये  इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: 237 crore funds approved by state government for farmers affected by heavy rains district wise list of fund distribution announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 07:41 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.