
धक्कादायक! 'लाडक्या बहिणीं'चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
नाशिक : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याची असतानाच असा कोणताही अधिकृत आदेश शासनाकडून आम्हाला प्राप्त झाला नाही, असे सप्ष्टीकरण जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थान जर मुदतवाढ दिली गेली नसेल तर हजारो महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आता निर्माण आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत होती. आता ही मुदत संपली असून, मात्र काही महिलांची तांत्रिक कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही, यामळे पुन्हा एकदा १ महिन्याची मुदत वाढवून दिल्याची चर्चा सध्या लाडक्या ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या तसेच कागपत्रांमध्ये असणाऱ्या त्रुटींमुळे अनेक लाभार्थी महिलांना बहिणीमध्ये रंगली आहे.
शासनाने https:/ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, परंतु हे संकेतस्थळ गुरुवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान बुधवारी अंतिम मुदत असल्याने ई-केवायसी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे दिवसभर सर्व्हर स्लोडाउन झाल्याने रात्री उशिरापर्यंत लाडक्या बहिणी संकेतस्थळ सुरु होण्याच्या प्रतीक्षेत होत्या.
दरम्यान, राज्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरच लाडक्या बहिणींना खूष करण्यासाठी केवळ मुदतवाढीची घोषणा करण्यात आली असल्याची चर्चा महिलांमध्ये रंगली आहे. शासनाने मुदतवाढ दल्यानंतर संकेतस्थळ बंद करून महिलांची चेष्टा करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रियाही महिलावर्गातून उमटत आहे.
८८ नाहीण योजेनच्या पात्र लाभार्थीना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ अखेरची मुदत होती. सध्या ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी मुदतवाढ दिलेली नाही आणि यासंदर्भात असा कोणताही अधिकृत आदेश आम्हाला प्राप्त झालेला नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दिली.