Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 10 महिन्यांत 47जणांचा बळी ; वनविभागाच्या डायरीत 5 वर्षांत 300 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद

मानवी वसाहतींमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढू लागल्यामुळे या दोन प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत 47 जणांचा बळी गेला आहे, तर वनविभागाच्या डायरीत पाच वर्षात 377 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 22, 2025 | 12:52 PM
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 10 महिन्यांत 47जणांचा बळी ; वनविभागाच्या डायरीत 5 वर्षांत 300 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद
Follow Us
Close
Follow Us:
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 10 महिन्यांत 47जणांचा बळी ;
  • वनविभागाच्या डायरीत पाच वर्षांत 300 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद
 

मुंबई : मानवी वसाहतींमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढू लागल्यामुळे या दोन प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत 47 जणांचा बळी गेला आहे, तर वनविभागाच्या डायरीत पाच वर्षात 377 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या डायरीनुसार, गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात 250, तर बिबट्यांच्या हल्ल्यात 87जणांचा मृत्यू झाला आहे. रानडुक्कर, कोल्हे, तरस, रानगवा इत्यादी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही अनेक जण जखमी झाले आहेत.

वन्यप्राण्यांचा वावर शहरी भागात वाढला वाघ, बिबट्या, रानडुक्कर, कोल्हे, तरस, अस्वल, लांडगा, माकड आणि खोकड यांचा वावर आता शहरी भागातही वाढला आहे. त्यामुळे मनुष्य आणि पशुधनावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. झपाट्‌याने होणारी जंगलतोड आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर झालेल्या मानवी घुसखोरीमुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे.

Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत

जंगलांची बेसुमार कत्तल झाल्यानेअन्न व आश्रयासाठी वन्यप्राणा मानवी वसाहतीकडे येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्ष अटळ झाला आहे. पिडितांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडितांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांचीआर्थिक मदत दिली जाते. परंतु मृत्यू आणि हल्ले पाहता मदत हा उपाय नसून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात आधी मानव आणि वाघ संघर्ष गंभीर होता. आता त्यामध्ये बिबट्याची भर पडली आहे.

एकट्या जुन्नर तालुक्यात एकूण साडेसातशे बिबटे

संपूर्ण राज्यात सुमारे पाच हजार बिबटे असून एकट्या जुन्नर तालुक्यात साडेसातशे बिबटे आहेत. त्याचप्रमाणे राज्यात 444 वाघ आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. बिबट्याचे हल्ले नागरी वस्तीत होऊ लागले आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जंगलात नागरी वस्ती वाढत असल्याने वन्यजीवही त्रस्त झाले आहेत. मात्र सर्वच बिबटे जंगलातले नाहीत, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर इत्यादी ठिकाणी उसाच्या शेतात बिबट्यांचा जन्म झाला आहे तेथेच ते वाढले आहेत.

Leopard Rescue : सात तासांची शोधमोहीम; आता मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत,हल्ल्यात सात जण जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मागील दहा महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: मागील दहा महिन्यांत वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात एकूण 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: : गेल्या पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती लोकांचा बळी गेला आहे?

    Ans: : वनविभागाच्या नोंदीप्रमाणे गेल्या पाच वर्षांत एकूण 377 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यातील मृत्यूंचे प्रमाण किती आहे?

    Ans: पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात 250 जणांचा, तर बिबट्यांच्या हल्ल्यात 87 जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 47 people killed in wild animal attacks in 10 months forest department diary records more than 300 deaths in 5 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • Leopard Attack
  • maharashtra

संबंधित बातम्या

Education Department : विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंद, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी
1

Education Department : विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंद, शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जारी

RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य
2

RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान
3

Maharashtra Local Body Election Result 2025 : चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व
4

Maharashtra Local Body Election Result 2025 : महायुतीची विजयाकडे वाटचाल…! नगरपालिकेच्या निकालांनी ठरवलं वर्चस्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.