Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Election 2026: देवर्डे येथे EVM बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक संतप्त

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू असताना, चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 07, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य-Gemini)

(फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:

Sangli Election 2026 : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रभर मतदानासाठी मोठा उत्साह आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक मतदान केंद्रांवर गर्दी करत आहेत. अशातच सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली.

देवर्डे येथील मतदान केंद्रावर मॉक पोल (ट्रायल) दरम्यान मतदान यंत्र (EVM) अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली. 7 फेब्रुवारीला सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासकीय नियमानुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राची चाचणी घेतली जात असते. देवर्डे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मतदान केंद्रावर ही प्रक्रिया सुरू असतानाच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यंत्र बंद पडले. यामुळे मतदानाच्या नियोजित वेळेत अडथळा निर्माण होऊन सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प राहिली. मशीन बंद पडल्याची माहिती मिळताच केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला.

Nashik Politics: एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग…; बडा नेता सोडणार साथ

निवडणूक विभागाने राखीव संचामधून नवीन मतदान यंत्र उपलब्ध करून दिले. बिघडलेले मशीन बदलल्यानंतर पुन्हा एकदा मॉक पोल घेऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेल्या नागरिकांना या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ ताटकळत उभे राहावे लागले. मात्र प्रशासनाने वेळेत यंत्र बदलल्याने मतदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि पुन्हा उत्साहाने मतदानासाठी रांगा लावल्या. सध्या देवर्डे परिसरात शांततेत आणि सुरळीतपणे मतदान सुरू आहे, अशी प्रतिक्रिया देवर्डे येथील रहिवासी नागरिक रमेश पंडित जाधव यांनी दिली आहे.

सांगलीत मतदानावर बहिष्कार…!

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. या निडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथीन ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावात सुमारे १२५,००० झाडे तोडण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून गावातील गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प विकसित केला जात आहे.

सकाळपासून एकही मतदान झाले नाही

फक्त याच कारणास्तव, ग्रामस्थांनी बेकायदेशीरपणे लावेली झाडांची कत्तल सुरू केली आहे. त्यामुळे इतरत्र ग्रामीण सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय निष्फळ ठरला असता. त्यानुसार, बालगावडेचे ग्रामस्थ आज होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकत आहेत आणि गाव बंद ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, बालगावडे गावात २३०० मतदार आहेत. दोन्ही मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी किंवा गावात एकही मतदान झाले नाही. गावकऱ्यांच्या या निर्णयाबाबत आता प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी काय तोडगा काढणार? गावकऱ्यांची कशी समजूत काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

Web Title: In dewarde voting was halted for half an hour due to an evm malfunction confusion at the polling station citizens angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sangli
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
1

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत
2

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

घरचे तज्ज्ञ असताना सल्लागार कशाला? पुणे महापालिकेत 30 हून अधिक सल्लागारांवर 32 कोटींहून अधिक खर्च
3

घरचे तज्ज्ञ असताना सल्लागार कशाला? पुणे महापालिकेत 30 हून अधिक सल्लागारांवर 32 कोटींहून अधिक खर्च

Sangli Crime: सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
4

Sangli Crime: सांगलीत खळबळ! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षणतज्ज्ञाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.