Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज; राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा

भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक म्हणून, नरेडको महाराष्ट्र राष्ट्रीय शहरी व रिअल इस्टेट विकास परिषद २०२६ मध्ये राज्याच्या सहभागाचे नेतृत्व करणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 07, 2026 | 05:43 PM
महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज (Photo Credit- X)

महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर! शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र नव्या उंचीवर!
  • शहरी विकासाच्या पुढील टप्प्यासाठी राज्य सज्ज
  • राष्ट्रीय परिषदेत उमटला ठसा
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्राचे रिअल इस्टेट क्षेत्र राज्याच्या शहरी विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकास, मजबूत औद्योगिक व व्यावसायिक क्रियाकलाप आणि विस्तारत असलेले महानगर क्षेत्र यांचा याला भक्कम आधार आहे. भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक म्हणून, नरेडको महाराष्ट्र राष्ट्रीय शहरी व रिअल इस्टेट विकास परिषद २०२६ मध्ये राज्याच्या सहभागाचे नेतृत्व करणार आहे.

१३ – १४ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी येथे होणारी ही परिषद राज्यांना त्यांच्या विकासाचा अनुभव आणि भावी दिशा मांडण्याचे व्यासपीठ देईल. मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नागपूर, नाशिक आणि इतर उदयोन्मुख शहरांतील पायाभूत सुविधा बळकट करणे, गृहनिर्माण पुरवठा सुधारणे आणि शाश्वत शहरी विकासास चालना देण्याचे प्रयत्न यामध्ये अधोरेखित केले जातील.

परिषदेत ट्रान्झिट-आधारित विकास, मोठ्या प्रमाणातील पुनर्विकास प्रकल्प, भाडेगृह योजना आणि निवासी-व्यावसायिक मिश्र विकासावर राज्याचा भर मांडला जाईल. व्यवसाय सुलभता, पायाभूत विस्तार आणि तंत्रज्ञानाधारित शहरी नियोजन यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल.

या परिषदेत धोरणनिर्माते, सरकारी अधिकारी, विकासक, वित्तीय संस्था, गुंतवणूकदार, शहरी नियोजक आणि तज्ञ सहभागी होतील. चर्चा शहरी पायाभूत सुविधा मजबूत करणे, गुंतवणूक वाढवणे, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञान वापर यावर आधारित असतील.

पैसे तयार ठेवा! SBI म्युच्युअल फंडचा मेगा-IPO सप्टेंबर २०२६ येण्याच्या तयारीत, 2200 कोटींचा नफा..

मुख्य चर्चांमध्ये, ‘ट्रान्सिट – ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) म्हणजेच ‘वाहतुकीवर आधरित विकास’, घरभाडे, शाश्वत पुनर्विकास, रेरा कायद्यातील सुधारणा, आय. बी. सी. व ग्राहक संरक्षण कायद्याशी सुसंगती, संस्थात्मक गुंतवणूक, मालमत्ता व्यवहारांचे डिजिटायझेशन, प्रॉपटेक आणि परवडणारे गृहनिर्माण यांचा समावेश असेल. हा अजेंडा ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

भारताचे रिअल इस्टेट क्षेत्र वेगवान शहरीकरण आणि अनुकूल धोरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. २०४७ पर्यंत शहरीकरण सुमारे ५० टक्के पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित चौकट आवश्यक ठरत आहे.

‘नरेडको महाराष्ट्र’ या महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या शिखर संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत शर्मा म्हणाले,

“महाराष्ट्र भारतातील शहरी आणि रिअल इस्टेट विकासात अग्रस्थानी राहिला आहे. या परिषदेद्वारे राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित विविध विषयांचा उहापोह होईल ज्यातून या क्षेत्राच्या विकासाला अधिक योग्य दिशा मिळेल. “

नरेडकोचे चेअरमन डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले,

“हा कार्यक्रम भारताच्या विकास प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यावर होत आहे.”

नरेडकोचे प्रेसिडेंट श्री प्रवीण जैन म्हणाले,

“शाश्वत शहरी विकासासाठी रचनात्मक संवाद व व्यवहार्य सुधारणा आवश्यक आहेत.”

ही परिषद देशभरातील सहभाग वाढवून धोरण, गुंतवणूक आणि नवकल्पनांना चालना देईल. नरेडको महाराष्ट्र राज्यातील सर्व संबंधितांना सक्रिय सहभागाचे आवाहन करते. राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषद म्हणजेच नरेडको या राष्ट्रीय शिखर संस्थेची स्थापना १९९८ मध्ये भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Trade Deal: अमेरिकन बाजारपेठेत भारतीय मालाला सुकाळ! औषधे, हिरे आणि कपडे होणार स्वस्त; पाहा कोणत्या वस्तूंवर लागणार ‘Zero Duty’

Web Title: Maharashtra real estate sector ready for national urban development summit 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Business News
  • maharashtra
  • real estate

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
2

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये
3

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
4

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.