67 82 crore development works in kalyan inaugurated by chief minister eknath shinde nrvb
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रातील सुमारे ६७ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले (Various development works were inaugurated by the Chief Minister of the state Eknath Shinde on Wednesday). बहुप्रतिक्षित बीएसयुपी घरांचे प्रकल्पग्रस्त आणि लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Emperor of Hindu Heart Balasaheb Thackeray) यांच्या स्वप्नातील भगवा तलावातील म्युझिकल फाऊंटन आणि दोन डायलिसीस केंद्र तसेच दोन मलशुद्धीकरण केंद्रांचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून या प्रकल्पांना गती मिळाली. धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत १० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वाटपही यावेळी देण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी हजेरी लावली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना देण्यासाठी तीन महिन्यांपासून काम सुरू करण्यात आले होते. बुधवारी कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे आयोजित कार्यक्रमात सुमारे १० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या या उपक्रमाचे आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शासनाच्या योजना सर्वसामानन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू केलेला हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम असल्याचे सांगत योजनांचा हा कल्याण पॅटर्न राज्यभर रूजवण्याचेही शिंदे यांनी यावेळी सुचवले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना अंतर्गत ४ हजार ९१ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा पेटीचे वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनांतर्गत ४ हजार ७९८ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे प्रातिनिधिक स्वरूपात अनुदान तर १ हजार नागरिकांना शिधापत्रिकांचे वाटप तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांतर्गत १९४ लाभार्थ्यांना प्रतिमहिना १ हजार रुपये पेंशन आणि मातृत्व वंदन योजनेतील लाभार्थी महिलांना डीबीटी प्रक्रियेनुसार ६ हजार रुपयांचे प्रातिनिधिक स्वरूपात अनुदान किट देण्यात आले. तर सखी संवाद उपक्रम योजनेंतर्गत आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी महिलांना हेल्थ कीट चे वाटप करण्यात आले.
कल्याण पश्चिमेतील भगवा तलावामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १९.७६ कोटी रुपयांच्या निधितून सुशभिकरणाचे काम करण्यात आले. याचेही लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. धावते विजेचे कारंजे, पाणतळ अशा सुविधा काळा तलावात उभारण्यात आल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे सरोवर म्हणून तलावाचे नामकरणही करण्यात आले. कल्याणच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील बीएसयुपी प्रकल्पात घरे देण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला.
यामध्ये ३९७ सदनिका आणि ११९ व्यापारी गाळ्यांच्या चाव्यांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील घरांचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करता यावे यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यासाठी पालिकेचा लाखो रूपयांचा वाटाही राज्य शासनाने माफ करावा यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.
याच कार्यक्रमात वाडेघर आणि आंबिवली भागात वाढत्या नागरीकरणाचा विचार करुन ४६.१ कोटी रुपयांच्या निधीतून दोन नवीन मल शुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या दोन्ही केंद्रांचे तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेत १.४३ कोटी रुपये खर्च करून २ डायलिसिस केंद्रांचेही यावेळी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित जनेतला संबोधित करताना कल्याण हे ऐतिहासिक शहर असून या शहराशी जिव्हाळ्याचे नाते असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले. तसेच या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातू सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
तर, कल्याणमधील नागरिकांसाठी हा ऐतिहासिक दिवस असून मागील अनेक वर्षांपासून विविध विकासकामंमध्ये बाधित झालेले नागरिक हे बीएसयुपीच्या घरांकडे आशेने डोळे लावून बसले होते. ही घरे तयार होती, मात्र शासकीय धोरणानुसार लोकांना देता येत नव्हती ही एक मोठी शोकांतिका होती. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही घरे सामान्य नागरिकांना देण्याचा निर्णय घेतल्याने एक मोठा दिलासा या नागरिकांना मिळाला आहे. तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळत असल्याचा खूप आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत डोंबिवली पूर्व आणि पश्चिम मध्ये दोन डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले असून याचा अनेक गरजू रुग्णांना लाभ होणार आहे. तर अमृत अभियान अंतर्गत मौज वाडेघर आणि मौजे आंबिवली येथील मलशुद्धिकरण केंद्रांमुळे पर्यावरणाची हानी थांबणार आहे. असेही खासदारांनी यावेळी सांगितले.
ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी एक मास्टर प्लॅन तयार करावा जेणेकरून नागरिकांना पायाभूत सुविधा मिळण्याबरोबरच एक सुखकर आणि आनंदाचे आयुष्य जगू शकतील. कल्याण मतदारसंघातील विविध रस्ते विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ही यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, तसेच मल्लेश शेट्टी, महेश गायकवाड, राजेश कदम, महेश पाटील, निलेश शिंदे, प्रशांत काळे, रवी पाटील, नवीन गवळी, अण्णा रोकडे, छाया वाघमारे, संजय मोरे , वामन म्हात्रे आणि कल्याण डोंबिवलीमधील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.