Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangalwedha Voting: मंगळवेढा नगरपरिषदेसाठी 69.77 टक्के मतदान, किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली प्रक्रिया

आज नगरपरिषदेसाठी मतदान विविध ठिकाणी करण्यात आले आणि मंगळवेढ्यात काही किरकोळ प्रकरणं सोडल्यास मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. 69.77 टक्के मतदान करण्यात आले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 20, 2025 | 09:09 PM
नगरपरिषद निवडणूकीसाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी लांबलचक रांगा लावल्याचे छायाचित्रात दिसत आहे. (फोटो सौजन्य - शिवाजी पुजारी, मंगळवेढा)

नगरपरिषद निवडणूकीसाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी लांबलचक रांगा लावल्याचे छायाचित्रात दिसत आहे. (फोटो सौजन्य - शिवाजी पुजारी, मंगळवेढा)

Follow Us
Close
Follow Us:
  • मंगळवेढ्यात पार पडले मतदान
  • नगरपरिषदेसाठी करण्यात आले 69.77 टक्के मतदान 
  • किरकोळ कुरबुरी वगळता मतदान शांततेत 
मंगळवेढा: मंगळवेढा नगरपरिषदेसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये 69.77 टक्के इतके मतदान झाले असून सर्वाधिक मतदान महिलांचे 14 हजार 385 म्हणजेच पुरुषापेक्षा 134 महिला मतदारांनी अधिक मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कुठेही अनुचीत प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.  

मंगळवेढा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी शनिवारी, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळी थंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे यावेळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. सूर्याचा पारा जसजसा वाढत गेला त्या प्रमाणे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र होते. 

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच

प्रभाग 6 मध्ये सर्वाधिक मतदान 

शहरामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक 6 मध्ये 79.67 टक्के इतके नोंदविले गेले आहे. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 62.84 टक्के मतदान झाल्याचे नोंदविले गेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळे मतदाना करण्यामध्ये अधिक चुरस दिसून येत होती. शहरामध्ये 28 हजार 638 एकूण मतदार असून निवडणूकीसाठी 19 हजार 981 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. 

मतदारांनी लावली हजेरी 

मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी अपंग, वृद्ध आदी मतदारांनीही हजेरी लावली होती. दरम्यान एका मतदान केंद्रावर अपंगांना बसून जाण्यासाठीची व्हीलचेअर तुटल्यामुळे अपंग मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागला. मतदान शांततेत होणेकामी डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे आदी सर्वजण मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून होते. 

मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन निवडणूकीत दिल्याचा थेट आरोप माजी पालकमंत्र्यांनी प्रसार माध्यमाजवळ केल्याने मंगळवेढा तालुकयात चर्चेला उधाण आले आहे. इंग्लिश स्कूल प्रशालेत आदर्श मतदान केंद्र उभे करण्यात आले होते. ते फुग्याने सुशोभित केल्याने सर्व मतदारांचे लक्ष खेचून घेत असल्याचे चित्र होते.

आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवेढ्यात कर्नाटकातील दिंड्या दाखल

आज अनेक ठिकाणी नगरपरिषदेसाठी मतदान करण्यात आले आणि ठिकठिकाणी शांततेत मतदान पार पडले. गेल्या कित्येक वर्षापासून निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते आणि अखेर जनतेच्या वाट बघण्याला न्याय मिळाला आहे. यावेळी अनेक ठिकाणी जास्त प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले. गेल्या मतदानाच्या तुलनेत बऱ्याच ठिकाणी टक्केवारी वाढली असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान आता २१ डिसेंबर रोजी या मतदानाचा निकाल काय लागणार आहे याकडे जनता डोळे लाऊन बसली आहे.

Web Title: 6977 percent voting was recorded for the mangalwedha municipal council process completed peacefully

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Mangalwedha
  • Mangalwedha News

संबंधित बातम्या

Sangli Municipal Election 2025: सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती
1

Sangli Municipal Election 2025: सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
2

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न
3

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?
4

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.