Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भीमा व नीरा नदीपात्रातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतीला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना नदीकाठच्या भागात जाण्याचे टाळण्यासाठी आणि पूरस्थितीबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 20, 2025 | 12:32 PM
उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:

अकलुज : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने भीमा खोऱ्यातील धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणत सोडण्यात येत आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरण पूर्ण भरले असल्याने धरणातून रात्री साडेआठ वाजल्यापासून ७६ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत ७ वाजल्यापासून ४७ हजार ३५० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणातून मिळून संगमातून पंढरपूरच्या चंद्रभागेत १ लाख क्युसेकचा विसर्ग राहणार आहे.

उजनी धरणातून दुपारी १२ वाजता ५ हजार व दुपारी २ वाजता १० हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. सायंकाळी त्यात पुन्हा वाढ करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी होत आहे. भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामुळे खडकवासला, पवना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रात्री ७५ हजार क्युसेक आणि वीजनिर्मितीतून १ हजार ६०० असा एकूण ७६ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

दरम्यान, दोन्ही धरणातील एकत्रित सव्वा लाख क्युसेक विसर्ग भीमा नदीत राहणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाकानुसार विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्रातील सखल भागातील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.

गावांना सतर्कतेचा इशारा

भीमा व नीरा नदीपात्रातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतीला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना नदीकाठच्या भागात जाण्याचे टाळण्यासाठी आणि पूरस्थितीबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

नीरा नदीला पूर; कळंबोली पूल पाण्याखाली जाणार

नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढला आहे. भाटघर धरणात १०० टक्के, नीरा देवधर धरणात साठा ९८.९८ टक्के, वीर धरणात ९०.७४ टक्के पाणीसाठा आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीला पूर आला आहे. नीरा नदीवरील नातेपुते-वालचंदनगर मार्गावरील कळंबोली पूल पाण्याखाली जाणार आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला

उजनी आणि वीर दोन्ही धरणातून टप्प्याटप्याने विसर्ग वाढविला आहे. उजनीतून सकाळी ५ हजार, १० हजार, २१ हजार त्यानंतर रात्री ११ वाजता ७५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरु झाला. शिवाय वीर धरणातूनही सुरुवातील ३३ हजार, त्यानंतर ४२ हजार आणि सायकांळी ७ वाजता ४७ हजार ३५० क्युसेकचा विसर्ग सुरु होता.

Web Title: 76 thousand cusecs of water released into bhima river from ujani dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Bhima River
  • Maharashtra Rain
  • Rain Update
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?
2

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
3

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
4

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.