छत्रपती संभाजीनगर : जगभर श्रीरामाच्या मंदिर सोहळ्याचा ‘याची देही याची डोळा’ पाहणार असला तरी प्रभू श्रीराम सोहळ्याचा प्रसंग भारतीय टपाल खात्याने प्रत्यक्षात तिकीट स्वरुपात जगासमोर आणला होता. योगायोगाची बाब म्हणजे बरोबर सात वर्षापूर्वी म्हणजे २२ नोव्हेंबर २०१७ रोजीच प्रभू श्रीरामांच्या दरबारासह सर्व घटनांची ११ तिकिटाची मालिका छापली होती. या तिकिटांचा आणि इंग्रजकालीन चलनात देखील प्रभू श्रीरामांच्या दरबाराचा उल्लेख होता याचे संकलन संभाजीनगर येथील सुधीर कोर्टीकर यांच्याकडे आहे.
आपले भारतीय टपाल खातेही प्रभूरामचंद्राच्या भक्तीमधे एकरुप झालेले आहे असंच म्हणावं लागेल. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी भारतीय टपाल खात्याने प्रभूरामचंद्राच्या जीवनावर एक ११ तिकिटांची अप्रतिम अशी मालिका प्रसिद्ध केलेली आहे. भारतीय डाक विभागानी २२ नोव्हेंबर १७ च्या प्रसिद्ध केलेल्या आपल्या मालिकेमधून ‘प्रभूरामचंद्राचा जीवनपट’ उलघडला आहे, असंच म्हणावं लागेल.
आपल्या ‘फर्स्ट डे कव्हर’वर प्रभूरामचंद्राच्या जीवनातील प्रत्येक घटनांवर अतिशय सुंदर पेंटिंग अधोरेखित करण्यात आलेली आहे. पहिल्या फस्ट डे कव्हरवर रामचंद्रांनी शिवधनुष्य उचलले आणि तोडले त्याचं सुंदर चित्र आहे. दुसऱ्या कव्हरवर राम वनवासात निघालेले आहेत, म्हणून दशरथराजा रडताना दिसत आहे. तिसऱ्या कव्हरवर सीतेला सोडवण्यासाठी जटायू हा रावणाशी युद्ध वाराणसीतील तुलसी आश्रम मंदिरात झाले होते.