
नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; पोहोण्यासाठी पाण्यात उतरला अन् बुडून मृत्यू झाला
मालवण : मालवणमध्ये मासेमारी बोट बुडून तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. यातील तिघांचे देखील मृतदेह सापडले असून, हे सर्व खलाशी आचराचे असल्याची माहिती दिली जात आहे.
हेदेखील वाचा : ‘शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील तीन खलाशांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या खलाशांपैकी एक खलाशी पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर समुद्रात बुडालेल्या तिन्ही खलाशांचा शोध घेण्यात आला. या तिन्ही खलाशांचे मृतेदह सापडले असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.
रुग्णालयाबाहेर खलाशांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. या दुर्घटनेमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम आडकर यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बोट गंगाराम आडकर यांचीच होती. आडकर हे चौके विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. या घटनेमुळे आडकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्जेकोट गावावर शोककळा परसरली आहे.
हेदेखील वाचा : अकोल्यात मुसळधार पाऊस; घरांमध्येच शिरले पाणी, विदर्भातील जिल्ह्यांना आजपासून…