लातुर : शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकास रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही घटना लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील औसात घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कन्हेरी येथील शेतकऱ्यास शासकीय योजनेतून विहीर मंजूर झाली. या विहिरीच्या कामावरील मजूरांचे हजेरी मस्टरवर नावे नोंदवून त्यावर सही करण्यासाठी कन्हेरी गावाचे ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबायणे यांनी पाच हजार मागितले.
[read_also content=”आयकर विभागाची इकबाल चहल यांना नोटीस, आयटीच्या नोटीसमध्ये काय? : वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/notice-to-iqbal-chahal-of-income-tax-department-what-is-in-the-notice-of-it-read-detailed-nrdm-259731.html”]
ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबोयणे यांच्या मागणीनूसार संबंधित शेतक-याने त्यांना पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर माडीबोयणेला शेतक-याकडून पैसे घेताना औसा येथील मिनार हॉटेलात लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले.