Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 19, 2025 | 06:58 PM
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली 'ही' मोठी मागणी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरी केल्या आरोप केला आहे. त्यानंतर देशभरात खळबळ माजली असून राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली आहे.

यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते.

निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु निवडणूक आयोगाचा सध्याचा कारभार पहात त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. मतचोरीसाठी सत्ताधारी पक्षाला मदत करून लोकशाहीवर घाला घातल्याचा प्रकार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघड केला आहे. निवडणूकीत गैरप्रकार होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही निवडणुकीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, या निवडणूकीत vvpat वापरणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे परंतु निवडणुकीतील गैरप्रकार पहाता vvpat वापरावे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा

निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट समजून घ्यावी, तुम्ही तुमचं काम केलं नाही तर, जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. इतकेच नव्हे तर, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार येईल, तेव्हा तुम्ही कुठेही असलात, तुम्ही निवृत्त झाले असलात तरीही आम्ही तुमच्यावर कारवाई करणार, हे लक्षात ठेवा. असंही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला खडसावलं आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचे गंभीर आरोप केले. इतकेच नव्हे तर त्यांनी आयोगाकडून कशा पद्धतीने मतचोरी होत आहे, याचे पुरावेही सादर केले. त्यानंतर निवडणूक आयोग विरूद्ध राहुल गांधी असा संघर्षच निर्माण झाला आहे.

Web Title: A congress party delegation led by harshvardhan sapkal has met the state election commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • Election Commision
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
1

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल
2

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
3

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
4

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.