Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

शहराच्या विस्तारानुसार डीआय (डक्टाइल आयर्न) पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, तसेच भुयारी मलनि:स्सारण योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीने राबवणे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2025 | 10:53 AM
धुळ्यात उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणे अत्यावश्यक आहे. हे हब लवकरच उभारले जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक, आर्थिक आणि लॉजिस्टिक दृष्टिकोनातून व्यवहार्यता तपासून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कार्यवाहीस गती द्यावी. धुळे येथे उद्योगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधान भवन येथे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. ते म्हणाले, ‘धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी तांत्रिक, आर्थिक आणि लॉजिस्टिक दृष्टिकोनातून व्यवहार्यता तपासून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कार्यवाहीस गती द्यावी. धुळे येथे उद्योगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. देवपूर, वलवाडी आणि सखल भागांतील पावसाचे पाणी निचरा होईल, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधावा’.

हेदेखील वाचा : महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा होणार स्वस्त, देवेंद्र फडणवीसांची माहिती

याशिवाय, शहराच्या विस्तारानुसार डीआय (डक्टाइल आयर्न) पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, तसेच भुयारी मलनि:स्सारण योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीने राबवणे. दरवर्षी पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या वीज वापरासाठी महापालिकेवर 32 ते 33 कोटींचा खर्च होत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा

शहराचा विस्तार 46.46 चौरस किमीवरून 101.08 चौरस किमीपर्यंत झाल्याने, वाढलेल्या हद्दीतील मूलभूत सोयींसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. चाळीसगाव रोडलगत म्हाडाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारणे तसेच मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक, आमदार अनुप अग्रवाल आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेदेखील वाचा : Operation Muskaan मुळे ४१,१९३ लहान मुला-मुलींच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

Web Title: A logistics hub will be set up in dhule for industrial expansion says chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
1

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
4

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.