Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव

Amit Shah : पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अजितदादांची कार्यपद्धती नव्या राजकीय नेतृत्वासाठी विद्यापीठ असल्याचे सांगत शाह यांनी त्यांच्या ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 16, 2026 | 07:19 PM
Amit Shah : 'अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ'; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव

Amit Shah : 'अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ'; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक
  • ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
Amit Shah : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते. दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची त्यांना सखोल माहिती होती. त्यांची कार्यपद्धती नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी विद्यापीठाप्रमाणे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या लोकनेते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात आले. यानंतर नेहरू मेमोरियल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते.

अजितदादांचे पुणे जिल्हा, बारामतीशी अतूट नाते

अजितदादांचे पुणे जिल्हा, बारामती आणि पिंपरी-चिंचवडशी असलेले नाते अतूट होते. सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांनी जमिनीशी असलेली नाळ कायम ठेवली. सामान्य माणसाच्या प्रश्नांप्रती त्यांची बांधिलकी आणि एखाद्या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्याची हातोटी विलक्षण होती, असे शाह म्हणाले. कोविड काळातील त्यांची कार्यतत्परता आणि नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्नही त्यांनी अधोरेखित केले.

Indian Armed Forces: युद्धात कोण ठरणार वरचढ, माणूस की AI? पुण्यातील ‘मिलिट’मध्ये रंगले महत्त्वाचे चर्चासत्र

वित्तमंत्री म्हणून आर्थिक शिस्त

अजितदादांच्या शिस्तीचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते कणखर, शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व होते. सकाळी सहा वाजता कामासाठी तयार होऊन सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करण्याची त्यांची शिस्त सर्वांनी अनुभवली आहे.
वित्तमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक शिस्त राखण्यावर भर दिला. विकासकामांमध्ये निधीचा योग्य विनियोग आणि कामांची गुणवत्ता याबाबत ते आग्रही असत. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा अहवाल लवकर मिळावा, अशी विनंती आपण अमित शाह यांच्याकडे केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत

दादा पुणे जिल्ह्याचे शिल्पकार : एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना पुणे जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार संबोधले. पुणे मेट्रो, रिंग रोड आणि वाहतूक कोंडी सोडविण्याच्या प्रकल्पांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी हा क्षण भावनिक असल्याचे सांगत अजितदादांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रत्येक गावात, शाळेत आणि आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान सुनेत्रा पवार या भावुक झाल्या होत्या.

यावेळी ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अजित पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांच्या ‘ट्रिब्युट गॅलरी’ला मान्यवरांनी भेट दिली. आरोग्य, शिक्षण, सिंचन, जलसंधारण, ई-गव्हर्नन्स, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या योगदानाचा आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात आला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण कोणी केले?

    Ans: केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

  • Que: अजित पवार यांचा पुतळा कुठे उभारण्यात आला आहे?

    Ans: पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अजित पवार यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

  • Que: अमित शाह यांनी अजित पवार यांच्या कार्याचे कौतुक कसे केले?

    Ans: अजित पवार हे ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते. त्यांची कार्यपद्धती नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी विद्यापीठाप्रमाणे असल्याचे अमित शाह म्हणाले.

Web Title: Amit shah ajit pawar work tribute pune zilla parishad statue rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • Chief Minister Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…
1

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक
3

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड
4

Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.