Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Election Results: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे निर्णायक ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे) गटाकडे ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 21, 2026 | 04:06 PM
KDMC Election Results 2026

KDMC Election Results 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • कल्याण डोंबिवली  महानगरपालिकेत (केडीएमसी) कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही
  • मनसेच्या एका गटाकडून शिंदे गटाला पाठिंबा जाहीर
  • कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा
  KDMC Election Results: कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली  महानगरपालिकेत (केडीएमसी) कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, राजकीय घडामोडी अत्यंत रंजक झाल्या आहेत.  शिवसेना (शिंदे) गटाने कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी हालचाली तीव्र केल्या असून, आज कोकण भवन येथे महत्त्वपूर्ण घडामोड घडली. शिंदे गटाच्या नगरसेवकांनी येथे अधिकृतपणे आपला गट स्थापन केला. याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या नगरसेवकांनीही स्वतंत्र गट स्थापन करत शिवसेना (शिंदे) गटाला पाठिंबा जाहीर केला.

कोकण भवन येथे झालेल्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेकडून शिवसेना (शिंदे) गटाला अधिकृत पाठिंबा मिळाल्याची घोषणा केली. (Maharashtra Municipal Corporation Election 2026 )

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

यावेळी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “आज शिवसेना (शिंदे) गटाने आपल्या ५३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. तसेच मनसेनेही त्यांच्या ५ नगरसेवकांचा गट स्थापन करत आम्हाला समर्थन दिले आहे. आम्ही महायुतीतून निवडणूक लढलो असून, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार आहे.” या घडामोडीमुळे केडीएमसीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीत शिंदे गट आणि मनसे ने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला.  पण त्यानंतर कल्याण डोंबवलीत कोणत्या पक्षाचा महापौर होणार यावरून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या चर्चांच्या दरम्यान, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे अचानक  कोकण भवनात दाखल झाले.  यासंदर्भात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की,   महापौर महायुतीचाच होणार बाकी कुणाचाही नाही.  पण भविष्यात कोणाला आमच्यासोबत यायचे असेल तर आम्ही विकासासाठी त्यांना सोबत घेऊ,” असे स्पष्ट शब्दात श्रीकांत शिंदे यांनी  स्पष्ट केलं.(BMC Electoin 2026)

केडीएमसीतील सत्तासमीकरणे बदलली; बहुमतासाठी ‘६२’चा आकडा महत्त्वाचा

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे निर्णायक ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे) गटाकडे ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर भारतीय जनता पक्ष कडे ५० नगरसेवक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली; जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश

महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ११ नगरसेवक निवडून आले होते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे ५ नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटातील मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती.

सध्याच्या घडीला, मनसेचे निवडून आलेले ५ नगरसेवक आणि ठाकरे गटातून मनसेत गेलेले २ नगरसेवक, असे एकूण ७ नगरसेवक सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात. शिंदे गटाचे नेते यासंदर्भात मनसेशी सातत्याने चर्चा करत असले, तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे निर्णायक ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे) गटाकडे ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर भारतीय जनता पक्ष कडे ५० नगरसेवक आहेत.

महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ११ नगरसेवक निवडून आले होते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे ५ नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटातील मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी जात असताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर राहिले. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा असून, त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ११ वरून थेट ७ वर आले. विशेष म्हणजे, मनसेत गेलेले हे दोन नगरसेवक पूर्वी मनसेचेच कार्यकर्ते होते. त्यामुळे “आम्ही पुन्हा मनसेत गेलो” अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतल्याचे समजते.

 

 

Web Title: A major twist in kalyan dombivli politics mns forms an alliance with the shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • KDMC Election 2026
  • Municipal Election Result 2026

संबंधित बातम्या

NMC Election 2026 : फेरमतमोजणी पुन्हा होणार? नाशिकच्या प्रभाग २७ च्या अधिकाऱ्यांवर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप
1

NMC Election 2026 : फेरमतमोजणी पुन्हा होणार? नाशिकच्या प्रभाग २७ च्या अधिकाऱ्यांवर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप

PMC Election: 86 लाख रोकड, १२ लाखांची दारू अन्…; आचारसंहिता भंगाच्या तब्बल ‘इतक्या’ तक्रारी
2

PMC Election: 86 लाख रोकड, १२ लाखांची दारू अन्…; आचारसंहिता भंगाच्या तब्बल ‘इतक्या’ तक्रारी

BMC Mayoral Suspense: आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम
3

BMC Mayoral Suspense: आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम

Shiv Sena Symbol Case: भाजपला का नकोय शिंदे गटाचा महापौर? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पलटू शकतो सगळा गेम
4

Shiv Sena Symbol Case: भाजपला का नकोय शिंदे गटाचा महापौर? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पलटू शकतो सगळा गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.