Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandhini Movie : ‘बंधिनी’ मधून उलगडणार स्त्री भावविश्वाची संवेदनशील कहाणी!

मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीप्रधान कथांची परंपरा पुढे नेणारा ‘बंधिनी’ चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्या फिल्म्स निर्मित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित हा चित्रपट देविका या स्त्री पात्राच्या भावनिक प्रवासावर आधारित आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 29, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीप्रधान कथांची समृद्ध परंपरा पुढे नेणारा ‘बंधिनी’ हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सत्या फिल्म्स कंपनी निर्मित, सतीश वाघेला लिखित आणि संतोष मांजरीकर दिग्दर्शित ‘बंधिनी’ हा चित्रपट देविका या मध्यवर्ती पात्राभोवती फिरतो. एका स्त्रीच्या आयुष्यातील प्रेम, त्याग, कर्तव्य, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाचा संवेदनशील प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. ‘बंधिनी’ ही केवळ संघर्षाची कथा नसून नात्यांमधील प्रेम, आत्मसन्मान आणि भावनांचा वेध घेणारी कहाणी आहे.

Ashwini Mahangade : ‘मैं जितने आया ही नहीं, मैं…’,अभिनेत्री अश्विनी महांगडेने थेट चिखलात उतरून केली भातलागवड; व्हिडीओ व्हायरल

अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात स्त्रीच्या भावनिक संघर्षासोबतच तिच्या स्वत्वाच्या शोधाची कथा प्रभावीपणे उलगडणार आहे. दिग्दर्शक संतोष मांजरीकर यांनी सांगितले की, आजच्या काळातील प्रत्येक स्त्री स्वतःची स्वप्ने आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असते. ‘बंधिनी’ ही अशाच एका स्त्रीची कथा असून ती अनेक महिलांच्या आयुष्याशी जोडली जाईल.

निर्माता सतीश वाघेला यांनी सांगितले की, ‘बंधिनी’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून प्रत्येक कुटुंबाला आणि स्त्रीला स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहायला लावणारा भावनिक अनुभव आहे. चित्रपटात प्रसाद सुर्वे, अविनाश किर्ती, मिलिंद संगावार यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

Ram Gopal Varma : ‘परीक्षेत AI टूल्सना परवानगी..’, अँटी-पेपर लीक विधेयकावर राम गोपाल वर्मांचा सरकारला मोठा सल्ला

चित्रपटाचे संगीत रोहन पगारे यांनी दिले असून प्रशांत शांताराम नांदगावकर यांनी संगीत संयोजन केले आहे. कविता कृष्णमूर्ती, राहुल देशपांडे, वैशाली सामंत आणि देविका पणशीकर यांच्या सुरेल आवाजातील गाण्यांमुळे चित्रपटाची भावनिक बाजू अधिक प्रभावी होणार आहे. ‘बंधिनी’च्या माध्यमातून स्त्री मनातील भावना, संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Web Title: A sensitive story exploring the emotional world of a woman unfolds in bandhini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.