डोंबिवली MIDC तील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग (फोटो सौजन्य-X)
Dombivli Midc fire News Marathi : डोंबिवलीच्या एमआयडीसी (MIDC) फेज वन परिसरातील ऐरोसेल गारमेंट कंपनीत आज (23 जुलै) दुपारच्या वेळेत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आगीची माहिती मिळताच, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिसरातील गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेमुळे मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज वन परिसरात असलेल्या विश्वनाथ गारमेंट कंपनीत दुपारी अचानक आग लागली. त्यानंतर आग एरोसेल कंपनपर्यंत पोहोचली. आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील तीन ते चार अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापड प्रक्रिया करणारी एकमेव कंपनी आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कॅम्पसमधील गर्दी हटवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यांचे बचावकार्य सुरू आहे. आग कशी लागली आणि त्याचे कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे. या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कारखान्यातील कामगारांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या कारखान्यात कोणी अडकलं आहे का याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व कामगार सुखरूप आहेत आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. परिसरातील नागरिक व कामगार यांची गर्दी होत असल्याने पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी परिसरात गेल्या दोन महिन्यांत आगीची ही दुसरी घटना आहे. या परिसरातील एका केमिकल कंपनीला आग लागल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे एमआयडीसी भागातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून, आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.