Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: धक्कादायक! १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी; पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू

दिल्लीतील जंगपुरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने देशी पिस्तूलमधून गोळी सुटल्याने ३७ वर्षीय आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 10, 2026 | 09:38 PM
Crime News: धक्कादायक! १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी; पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

  • धक्कादायक!
  • १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी
  • पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू
देशाची राजधानी दिल्लीतून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने झाडल्या गेलेल्या गोळीमुळे त्याच्या ३७ वर्षीय आईचा मृत्यू झाला आहे. हौस म्हणून आईला देशी बनावटीचे पिस्तूल दाखवत असताना ही भीषण दुर्घटना घडली. या एका चुकीमुळे एक हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले आहे.

नेमकी घटना कशी घडली?

ही घटना दिल्लीतील जंगपुरा परिसरातील पंत नगरमध्ये घडली. मृत महिलेची ओळख सुमती (३७) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमती यांचा १८ वर्षांचा मुलगा सोमवारी रात्री घरी पिस्तूल घेऊन आला होता. त्याने हे बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) आश्रमातील एका व्यक्तीकडून विकत घेतले होते. रात्री १०:३० च्या सुमारास तो हे पिस्तूल आपल्या आईला दाखवत असताना, अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट सुमती यांच्या तोंडावर लागली.

हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

गोळीचा आवाज ऐकून परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या सुमती यांना तातडीने मूलचंद हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, गोळी वर्मी लागल्याने आणि प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लाजपत नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Nashik Crime : बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी

हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त

सुमती या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जवळच्या घरांमध्ये घरकाम करत होत्या. त्यांचे पती छोटू हे रोजंदारीवर माळी म्हणून काम करतात. सुमती यांच्या पश्चात पतीसह ११ वर्षांची मुलगी आणि इतर दोन मुले असा परिवार आहे. घटनेच्या वेळी तिचे पती घरी उपस्थित नव्हते. एका क्षणाच्या अनावधानाने पोटच्या मुलाच्या हातूनच आईचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरोपी मुलाला अटक, पिस्तूल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर घाबरलेल्या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पिस्तूल जवळच्या नाल्यात फेकून दिले. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपी मुलाला अटक केली आणि त्याने नाल्यात फेकलेले शस्त्रही जप्त केले आहे.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या (Arms Act) कलम २५, २७ आणि ५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याने या मुलाला बेकायदेशीररीत्या पिस्तूल विकले होते.

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

Web Title: 18 year old boy accidentally shoots himself mother dies at the hands of her unborn child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • crime news
  • delhi
  • Fire

संबंधित बातम्या

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन
1

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…
2

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड
3

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप
4

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.