
मुंबई – मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून मुंबईतील रेल्वे लोकलकडे पाहिले जाते. दररोज लाखो प्रवाशी या लोकलने ये जा करतात. दरम्यान, शनिवार आणि रविवार मध्यरात्री ४ एफओबी गर्डर्स लाँच करण्यासाठी ठाणे-कोपर खैरणे ट्रान्स-हार्बर सेक्शनवर ठाणे स्टेशनच्या सीएसएमटी टोकावर रात्रीची विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. (a special night power block on the trans harbour section at midnight on weekends, for these reasons)
ब्लॉक तपशील:
• 140 MT रोड क्रेन वापरून ठाणे स्टेशनच्या सीएसएमटी टोकावर (स्पॅन 7) किमी 32/21-22 येथे 5.00 मीटर रुंद FOB गर्डर्स (4) लाँच करण्यासाठी रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक.
ब्लॉक विभाग :
• ठाणे-कोपर खैरणे विभाग – अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन (प्लॅटफॉर्मसह आणि क्रॉसओव्हर वगळता)
ब्लॉकची तारीख, वेळ आणि कालावधी:
दिनांक 12/13-08-2023 (शनिवार/रविवार मध्यरात्री) – 12.8.2023 रोजी 11.50 PM ते 13.8.2023 रोजी 04.50 AM – (5.00 PM)
ब्लॉक कालावधीत खालीलप्रमाणे गाड्या चालवल्या जातील:
• ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर उपनगरीय सेवा रद्द राहतील.
• ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे – पनवेल लोकल ठाण्याहून रात्री 11.32 वाजता सुटेल.
ठाण्याला जाण्यासाठी ब्लॉक करण्यापूर्वी शेवटची लोकल – ठाणे लोकल पनवेलहून रात्री 10.45 वाजता सुटेल
या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.