Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव! कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’

कोकणातील आंबा वैभव, पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम अनुभवण्याची संधी ‘आंबा महोत्सव २०२६’च्या माध्यमातून पर्यटकांना मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2026 | 09:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

कोकणातील आंबा वैभव, पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम अनुभवण्याची संधी पर्यटकांना ‘आंबा महोत्सव २०२६’च्या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्षानिमित्त पर्यटन विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथे १५ ते १८ मे २०२६ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री Shambhuraj Desai यांनी ही माहिती देत पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात उबाठा गट आक्रमक, जनजागृती करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा इशारा

‘फार्म टू टेबल’ संकल्पनेवर आधारित या महोत्सवात शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत विविध प्रकारचे आंबे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय स्थानिक कोकणी उत्पादने, आंब्यापासून तयार खाद्यपदार्थ आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवादरम्यान दशावतार, पालखी सोहळा, स्वराज्य आख्यान, कोकण कलेक्टिव्ह बँड आणि ‘होम मिनिस्टर’सारखे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत.

पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला, तसेच तारकर्ली, मालवण, देवबाग आणि कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य अनुभवता येणार आहे. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, जेट स्कीइंग आणि डॉल्फिन सफारीसारख्या जलक्रीडांचाही आनंद घेता येणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून रेल्वे, बस आणि सिंधुदुर्ग चिपी विमानतळाद्वारे महोत्सवस्थळी सहज पोहोचता येणार आहे.

पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे यांनी या महोत्सवामुळे स्थानिक पर्यटन, शेती आणि सांस्कृतिक वारशाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी आंबा उत्पादकांसाठी विविध योजनांची माहिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सव अधिक आकर्षक ठरणार असल्याचे सांगितले.

Mumbai News : भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू; डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “‘आंबा महोत्सव २०२६’ मध्ये ‘फार्म टू टेबल’ संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून थेट आणलेले ताजे आंबे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच स्थानिक कोकणी उत्पादनांची विक्री आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोकणची समृद्ध संस्कृती, चव आणि परंपरांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मी करतो.”

Web Title: A unique celebration of konkans mango glory the mango festival 2026 set to unfold at kunkeshwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • kokan
  • Kokan News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.